मुंबई बातम्या

भलं मोठं पहाडी सँडविच कधी खाल्लंय? ‘इथं’ करा ट्राय, Video – News18 लोकमत

मुंबई, 10 नोव्हेंबर : धावपळीच्या युगात वडापावसारखाच झटपट मिळणारा आणि खाता येणारा पदार्थ म्हणजे सँडविच. मुंबई आणि परिसरात सँडविचचे वेगवेगळे प्रकार सर्वत्र उपलब्ध आहेत. त्यामध्ये ठाणेमधील एका कॅफेत चक्क पहाडासारखं सँडविच मिळतं. हे सँडविच कसं आहे? त्याची खासियत काय आहे? हे पाहूया
कसं बनवतात पहाडी सँडविच?
पहाडी सँडविच बनवताना सुरूवातीला पाच ब्रेड्स विशिष्ट प्रकारे कापले जातात. त्यानंतर त्यावर फ्लेवर चटणी लावली जाते.  काकडी, कांदा, बिट, वाफवलेला बटाटा, कोबी या सर्व गोष्टी एकेका स्लाईसवर रचल्या जातात. त्यानंतर त्याला बटर लावून ग्रील केले जाते.
हे ग्रील केल्यानंतर या सँडविचचे सहा तुकडे केले जातात. त्यानंतर थर लावून त्यावर चीज आणि कोथिंबिर टाकली जाते. तसंच प्रत्येक तुकड्यात एक स्टिक ठेवली जाते.

कसं खाणार?

स्टिक मध्ये घातलेलं सॅन्डविच पाच लेयर्सचं असतं. त्यामुळे ते एकाच वेळी संपूर्ण खायाला जमत नाही. स्टीकमध्ये अडकवून खायला ते सोपं होतं. एखाद्या पहाडासारखं दिसणारं हे सँडविच दोन जण पोटभर खाऊ शकतात. त्यामध्ये असलेल्या चीज आणि भाज्यांमुळे पोट लवकर भरतं.

गुगल मॅपवरून साभार

हे सँडविच कुठे मिळतं?

ठाणे पश्चिमेला रेल्वे स्टेशनपासून  1 किलोमीटर अंतरावर अक्कड बक्कड बॉम्बे बू हे सँडविच कॅफे आहे. तेथेच हे पहाडी सॅन्डविच मिळतं. हे पहाडी सँडविच खायला खूप जण येतात आणि बेस्ट सेलर सँडविच ठरलं आहे.

मिसळ शॉट्स : झणझणीत मिसळसोबत खा कुरकुरीत पाणीपुरी, पाहा Video

ठाण्यासह मुंबईतील वांद्रे आणि कांदिवली तसेच गुजरातमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हे सँडविच खायला मिळतं. मुंबईत बाहेर कुठेच खायला मिळणार नाहीत, अशा प्रकारचे सँडविच आमच्याकडे उपलब्ध आहेत. 40 रुपयांपासून 350 रुपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच आमच्याकडे उपलब्ध आहेत, असं या दुकानाच्या मालक प्रियांका यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS9ha2FkLWJha2FkLWJvbWJheS1ib29tLWEtcGxhY2Utd2hlcmUteW91LWNhbi1lYXQtc2FuZHdpY2gtbGlrZS1wYWhhZC1tdW1iYWktNzgzNzgxLmh0bWzSAYgBaHR0cHM6Ly9sb2ttYXQubmV3czE4LmNvbS9hbXAvbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpL2FrYWQtYmFrYWQtYm9tYmF5LWJvb20tYS1wbGFjZS13aGVyZS15b3UtY2FuLWVhdC1zYW5kd2ljaC1saWtlLXBhaGFkLW11bWJhaS03ODM3ODEuaHRtbA?oc=5