Ajit Pawar : पुण्यात अजित पवारांच्या सभेआधी गोंधळ, बॅनर लावण्यावरून मोठा वाद
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. यानंतर पोलिसांनी त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता हा फोन बंद येत होता. संबंधित फोन हा उल्हासनगरहून आला असल्याचं तपासात समोर आलं. पोली सध्या फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
दर्ग्यावर दहशतवादी हल्ला केला जाणार असल्याची धमकी मिळताच तात्काळ ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बीडीडीएस, कॉन्वेंट वेनलाही पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी दर्ग्याच्या आजूबाजूच्या परिसरात बराच वेळ तपासणी केली. मात्र, याठिकाणी कोणालाच काहीही सापडलं नाही. धमकीचा फोन करणारी व्यक्ती उल्हासनगरची असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस सध्या या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
मोठी बातमी! शीना बोरा अजूनही जिवंत, इंद्राणीच्या वकिलांनी केलेल्या दाव्याने खळबळ
याआधीही अनेकदा आलेत धमकीचे फोन –
मुंबई पोलिसांकडे अशाप्रकारे धमकीचा फोन येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा पोलिसांना धमकीचे फोन आले आहेत. मुंबई पोलिसांना दोन आठवड्यांपूर्वीही एका व्यक्तीने फोनवरून धमकी दिली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार असल्याचं त्यानं म्हटलं होतं. हा फोन हेल्पलाइन क्रमांक ११२ वर करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMieGh0dHBzOi8vbG9rbWF0Lm5ld3MxOC5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpL2hhamktYWxpLWRhcmdhaC10ZXJyb3ItYXR0YWNrLXRocmVhdC1jYWxsLXRvLW11bWJhaS1wb2xpY2UtbWhrcC03ODE4ODIuaHRtbNIBAA?oc=5