म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. या वेळी राज्यातील रेल्वेच्या विविध प्रकल्पांविषयीची माहिती दिली. ‘नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर भूसंपादन करताना आम्ही हायस्पीड रेल्वेसाठी जागा सोडली आहे. या प्रकल्पासाठी ६८ टक्के जमीन संपादित करण्यात आली असून, ३२ टक्के जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. त्याचे काम सुरू करून डीपीआर तयार करावा. अशी मागणी केली. या माहिती फडणवीस यांनी दिली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करणार आहोत. त्याबाबत पंतप्रधानांकडून सकारात्मक संदेश आला असून दिवाळीनंतर उद्घाटनाची तारीख ठरवू,’ असेही फडणवीस म्हणाले.
‘समृद्धी’शेजारी हायस्पीड कार्गो रेल्वे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी माहिती
वैष्णव यांच्याबरोबर पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची चर्चा झाली. हायस्पीड रेल्वेसाठी ‘ॲट ग्रेड’ स्वरूपाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याऐवजी आता ‘रेल्वे कम रोड’ असा प्रस्ताव देण्यात येणार आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, मुंबई ते सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी मुंबई ते सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत’ रेल्वेसंदर्भात विनंती केली होती. या एक्स्प्रेसमुळे अतिशय कमी वेळात मुंबईतून सोलापूरला जाता येईल, त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात जनतेला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिंदे, फडणवीस, पवार यांचे आज स्नेहभोजन; एकाच व्यासपीठावर एकत्र येणार
Source: https://maharashtratimes.com/india-news/mumbai-solapur-vande-bharat-express-says-devendra-fadnavis/articleshow/94953311.cms