मुंबई बातम्या

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर कस्टम पथकाची मोठी कारवाई, 9.8 कोटी रुपयांचे कोकेन जप्त – Times Now Marathi

मुंबई विमानतळावर 9.8 कोटी रुपयांचे कोकेन जप्त&  | & फोटो सौजन्य:&nbspANI

थोडं पण कामाचं

  • सोमवारी मुंबई विमानतळावर (Mumbai airport ) कस्टम पथकानं मोठी कारवाई केली आहे.
  • मुंबई विमानतळावरून कस्टम पथकाने 9.8 कोटी रुपयांचे कोकेन (cocaine) जप्त केले.
  • मुंबईत एकाच आठवड्यातील अशी ही दुसरी घटना आहे.

मुंबई: Mumbai Airport Customs Seized Cocaine: सोमवारी मुंबई विमानतळावर (Mumbai airport ) कस्टम पथकानं मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावरून कस्टम पथकाने 9.8 कोटी रुपयांचे कोकेन (cocaine) जप्त केले. आदिस अबाबाहून इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ET-610 वरून मुंबई विमानतळावर ( Ethiopian Airlines flight)आलेल्या प्रवाशाकडून हे कोकेन जप्त करण्यात आले आहेत. (Mumbai Airport Customs seized 980 grams of Cocaine worth Rs 9.8 crores read in marathi)

हा कारवाईत सीमाशुल्क पथकानं 9.8 कोटी रुपयांचे 980 ग्रॅम कोकेन जप्त केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातून कोकेनची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सध्या तस्कराला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

अधिक वाचा-  Dussehra Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट अन् ठाकरेंना गर्दी वाढविण्याचं टेन्शन, हजारो एसटी, खासगी बसेसचे बुकिंग

4.9 कोटींचे कोकेन जप्त केले जप्त 

मुंबईत एकाच आठवड्यातील अशी ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 29 सप्टेंबर रोजी मुंबई विमानतळावर कस्टमच्या पथकाने 490  ग्रॅम कोकेन घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला पकडले होते. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत 4.9 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आलं आहे.. महिला प्रवाशाने तिच्या सँडलमध्ये बनवलेल्या एका खास छिद्रात कोकेन लपवून ठेवल्याचे सांगण्यात आले. प्रवाशी महिलेला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

बोलिव्हियन महिलेला अटक

त्याच वेळी, यापूर्वी NCB ने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 13 कोटी रुपयांच्या 3.2 किलो ब्लॅक कोकेनसह बोलिव्हियन महिलेला अटक केली होती. बोलिव्हियन महिला ब्राझीलहून गोव्याला जात होती. यादरम्यान ती आदिस अबाबा, इथिओपिया आणि मुंबई येथे राहिली होती. ही महिला मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी विमानात बसणार होती, त्यावेळी तिला अटक करण्यात आली आणि झडतीदरम्यान अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/article/mumbai-airport-customs-seized-980-grams-of-cocaine-worth-rs-98-crores-read-in-marathi/444835