सहानीने सांताक्रूझ येथे राहणाऱ्या रफत हुसेन नावाच्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल केला आणि त्याला ‘बॉम्बस्फोट करना है इंडिया में विनाश है’ असे सांगितले.या फोन कॉलनंतर तक्रारदार, जो राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे, त्याने मुंबई पोलिसांना माहिती दिली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी तक्रार घेऊन व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ५०६(२) अन्वये गुन्हा दाखल केला.गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Edited By – Naresh Shende
Source: https://www.saamtv.com/mumbai-pune/mumbai-crime-branch-police-arrested-culprit-ranjit-kumar-sahani-giving-bombing-threat-mumbai-crime-latest-update-nss91