कार पार्किंग नसताना एका फ्लॅटमधील नागरिकांना ४-५ कार खरेदीला मनाई – हायकोर्ट&
थोडं पण कामाचं
- कार पार्किंग नसताना एका फ्लॅटमधील नागरिकांना ४-५ कार खरेदीला मनाई – हायकोर्ट
- स्वतःकडे जेवढ्या कार आहेत तेवढ्यांसाठी स्वतःचे कार पार्किंग आहे का हे तपासणे महत्त्वाचे
- मुंबई सारख्या शहरांमध्ये रस्त्याचा २५ ते ४० टक्के भाग कार पार्किंगसाठी वापरला जातो
मुंबईः स्वतःकडे जेवढ्या कार आहेत तेवढ्यांसाठी स्वतःचे कार पार्किंग आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे. कार पार्किंग नसताना एका फ्लॅटमधील नागरिकांना ४-५ कार खरेदी करण्यास मनाई करणे आवश्यक आहे; अशा स्वरुपाचे मतप्रदर्शन मुंबईच्या उच्च न्यायालयाने (बॉम्बे हायकोर्ट) केले. Bombay High Court said a family owning only one flat should not be allowed to own four-five cars
कार पार्किंगचे धोरण अस्तित्वात नसल्यामुळे परिस्थिती चिंताजनक होत आहे. मुंबई सारख्या शहरांमध्ये रस्त्याचा २५ ते ४० टक्के भाग कार पार्किंगसाठी वापरला जात आहे. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावणे, वाहतूक कोंडी होणे हे प्रकार वाढत आहे. या समस्येवर लवकर उपाय शोधण्याची आवश्यकता मुंबईच्या उच्च न्यायालयाने (बॉम्बे हायकोर्ट) व्यक्त केली.
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी राज्याचे अधिवक्ता मनिष पाबळे यांना दोन आठवड्यांत कार पार्किंग प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकुर यांच्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्यावेळी उच्च न्यायालयाने निर्देश दिले.
बातमीची भावकी
मुंबईत मंत्रालय ते कूपरेज रोड या भागात कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि मजबुतीकरण केले आहे. ही व्यवस्था कार पार्किंगसाठी केली आहे का, असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला.
Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/bombay-high-court-said-a-family-owning-only-one-flat-should-not-be-allowed-to-own-four-five-cars/358420