मुंबई बातम्या

मुंबई लोकलमध्ये कोरोनापासून बचावासाठी देशी जुगाड, युवक काँग्रेस अध्यक्ष तांबेंचे ट्विट – Sakal

अहमदनगर : कोरोनाने महाराष्ट्रात पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. लॉकडाउनची भीती लोकांना सतावते आहे. तरीही पूर्वीप्रमाणे लोकं कोरोनाच्या महामारीला गंभीरतेने घेत नाहीत, त्यातून रूग्णांची संख्या वाढते आहे. नगर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी केली आहे. 

अमरावती, जालना, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग जास्तीचा आहे. महानगरी मुंबई, पुणे, नागपूरमध्येही कोरोनाचा फैलाव होतो आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह सर्वांनीच लोकांना खबरदारीचा उपाय करण्यास सांगितले आहे. मास्कही वापरत नाहीत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात नियमांचे उल्लंघन होताना दिसते.

विशेषतः मुंबई मेट्रो, लोकलमध्ये नियम पाळले जात नाहीत. तेच कोरोना फैलावाची केंद्र आहेत. मुंबई लोकलमध्ये एका प्रवाशाने मास्क नाका-तोंडाऐवजी डोळ्याला लावला आहे. आणि निवांत झोपला आहे. हे छायाचित्र कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये टिपले. ते  युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे त्यांनी ट्विट करताना बिचाऱ्या कोरोनाची काय चूक, असं म्हणलं आहे.

तांबे यांच्या या ट्विटची मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दखल घेत रिट्विट केलं. “मित्रांनो असं बेजबाबदार वागू नका!, मास्कचा योग्य वापर करा. 

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची वाढ होत आहे. ती लोकांना परवडणारी. लॉकडाउन झालं तर त्याचा फटका गरिबांना बसतो. याची काळजीही घेतली पाहिजे. सिनेमागृहे- मंगल कार्यालयात होणाऱ्या गर्दीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महत्वाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे आणि ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू आहे,असेही वडेट्टीवार म्हणाले. 

Source: https://www.esakal.com/ahmednagar/negligence-people-mumbai-local-train-413630