हायलाइट्स:
- राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जनजागृतीवर भर देत मुंबई पोलिसांनी नागरिकांना एक खास संदेश दिला आहे.
- मास्कचा वापर, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीवर शासनानं भर दिला आहे.
- त्यांपैकी हात धुण्याबाबत पोलिसांनी हा संदेश दिला आहे. यासाठी पोलिसांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ या प्रसिद्ध चित्रपटातील प्रसंगाचा कल्पकतेने वापर केला आहे.
मुंबई: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग वाढत असताना जनजागृतीवर भर देत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नागरिकांना एक खास संदेश दिला आहे. मास्कचा वापर, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीवर शासनानं भर दिला आहे. त्यांपैकी हात धुण्याबाबत पोलिसांनी हा संदेश दिला आहे. यासाठी पोलिसांनी बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘अग्निपथ’ या प्रसिद्ध चित्रपटातील एका दृश्याचा कल्पकतेने वापर केला आहे. (mumbai police gave a special message to the people to create awareness about corona)
अग्निपथ या चित्रपटातील एका दृश्याचा व्हिडिओ पोलिसांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यात घरी जेवण्यासाठी आलेल्या विजयला त्याची आई ‘अपने हाथ धोले’ असे सांगत आहे. या प्रसंगामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, रोहिणी हट्टंगडी आणि नीलम दिसत आहेत.
जेवण्यापूर्वी विजय हात धुत नाही हे पाहून त्याची आई रागावलेली आहे. तत्पूर्वी विजयची बहीण विजयला आईने तुझ्या आवडीचे पदार्थ बनवल्याची माहिती देते. त्यावर विजय, आईला माझी आवड माहीत आहे. त्यावर रागावलेली आई म्हणते, ‘क्या आपने कभी जाजने की कोशिश कि कि मां को क्या पसंद है?’… त्यानंतर आई विजयला सांगते की जेवणापूर्वी तू तुझे हात धुवायला हवेत. त्यानंतर विजय हात स्वच्छ करतो.
क्लिक करा आणि वाचा- रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ; ग्राहक पंचायतीने शासनाला दिले ‘हे’ पर्याय
हा व्हिडिओ, ‘अपने हाथों को धोले, कोरोना को दूर करे’, असा संदेश देत समाप्त होतो.
क्लिक करा आणि वाचा- पुणे: विद्यापीठ चौकात धावत्या कारला आग लागली अन…
मुंबई पोलिसांनी करोनावर दिलेला हात धुण्याचा हा कल्पक संदेश लोकांना आवडलेला दिसत आहे. पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या या प्रयत्नांचे लोक कौतुक करत आहेत. या व्हिडिओला लोकांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- … तरीही पुणे जिल्ह्यातील ‘हे’ शेतकरी कर्जमुक्तीपासून राहिले वंचित
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/based-on-a-scene-from-the-film-agneepath-mumbai-police-gave-a-special-message-to-the-people-to-create-awareness-about-corona/articleshow/81178828.cms