मुंबई बातम्या

‘व्हॅलेंटाईन डे ऑफर’च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, मुंबई पोलिसांकडून सावधानतेचा इशारा! – TV9 Marathi

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ‘व्हॅलेंटाईन डे’ संबंधित मुंबईच्या ताज हॉटेलचे कूपन व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ‘व्हॅलेंटाईन डे’ संबंधित मुंबईच्या ताज हॉटेलचे कूपन व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबई : सायबर गुन्हेगारीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज हजारो लोक या डिजिटल चोरांच्या जाळ्यात अडकत आहेत. अशातच आता आणखी एक प्रकरण समोर येत आहे. फेब्रुवारी महिना सुरु झाला आहे. या दिवसांत ‘व्हॅलेंटाईन डे ऑफर’च्या अनेक ऑफर देणारे मेसेज आपल्याला येतात. असाच एक मेसेज सध्या सगळ्यांच्या मोबाईलवर पाठवला जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे ऑफर’च्या नावाखाली एका लिंकद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. याच संदर्भात मुंबई पोलिसांनी आता अलर्ट जारी केला आहे (Mumbai Police alert on Valentine Day Taj Gift Card fake message).

जेव्हा कोणतेही सण-उत्सव जवळ येतात, तेव्हा अनेक हॉटेल्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर सुरू करतात. असे केल्याने ते फक्त त्यांच्या हॉटेलची जाहिरात करतातच, परंतु नफा लक्षात घेऊन बरीच गिफ्ट व्हाऊचर देखील देतात. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ‘व्हॅलेंटाईन डे’ संबंधित मुंबईच्या ताज हॉटेलचे कूपन व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कूपनमध्ये असा दावा केला जात आहे की, या माध्यमातून आपण ताज हॉटेलमध्ये 7 दिवस विनामूल्य राहू शकता. हा मेसेज व्हायरल होताच, ताज हॉटेलनेही त्यांचे निवेदन जारी केले आहे. त्यांनी देखील हा मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे.

काय आहे हा मेसेज?

लोकांना व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज मिळतोय. ज्यामध्ये लिहिलंय की ‘आपल्याला ताज हॉटेलकडून एक गिफ्ट कार्ड मिळाले आणि 7 दिवस राहण्याची संधी देखील मिळाली आहे.’ मेसेजसोबत एक लिंक पाठवली जात आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यास एक वेबसाईट उघडली जाते. ज्यावर ‘ताज एक्सपीरियंस गिफ्ट कार्ड, ताज हॉटलने व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी 200 गिफ्ट कार्ड पाठवले आहेत. तुम्ही या कार्डचा उपयोग ताज हॉटेलमध्ये 7 दिवस राहण्यासाठी करु शकता. तुमच्याकडे 3 संधी आहेत. गुड लक.’, असा मेसेज येतो.

या वेबसाईटवर गिफ्ट कार्ड क्लेम करण्यासाठी ओके क्लिक केल्यावर दुसरे पेज ओपन होते. इथे काही प्रश्न विचारले जातात. ज्याची उत्तरे दिल्यानंतर आणखी एक पेज उघडले जाते. जिथे टाटाच्या लोगोचे 12 बॉक्स दिसतात. यावर क्लिक केल्यावर तुम्ही गिफ्टकार्ड जिंकलात की नाही हे कळते. त्याचबरोबर हा मेसेज इतर 5 ग्रुप आणि 20 लोकांना पाठवण्याच्या टास्क दिला जातो (Mumbai Police alert on Valentine Day Taj Gift Card fake message).

Cyber Fraud

मुंबई पोलिसांचे निवेदन

‘ताज’ने केले खंडन

या दाव्यांचा खंडन करताना ताजच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केले गेले आहे. ताज हॉटेलने ट्विटमध्ये म्हटले की, ‘आमच्या लक्षात आले आहे की, एक वेबसाईट व्हॅलेंटाईन डेचा प्रचार करत आहे, ज्या अंतर्गत ताजमध्ये राहण्याची संधी दिली जात ​​आहे. आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की ताज हॉटेल्स / आयएचसीएलने अशी कोणतीही ऑफर दिली नाही. याकडे दुर्लक्ष करण्याची काळजी आपण घ्यावी ही आमची विनंती.’

मुंबई पोलिसांचे निवेदन

या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांनीही निवेदन जारी करून लोकांना जागरुक राहण्यास सांगितले आहे. या निवेदनात म्हटले आहे- ‘व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर मोफत गिफ्ट कार्ड किंवा कूपनबद्दल एक संदेश व्हायरल होत आहे. तुम्ही सर्वांना विनंती केली आहे की अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. तसेच, कोणत्याही अज्ञात क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही दुव्यावर क्लिक करू नका.’

(Mumbai Police alert on Valentine Day Taj Gift Card fake message)

हेही वाचा :

Source: https://www.tv9marathi.com/business/mumbai-police-alert-on-valentine-day-taj-gift-card-fake-message-387130.html