पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात.
- Share this:
मुंबई, 14 जानेवारी: गुरुवारी 14 जानेवारी 2021 रोजी पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price) चे दर वधारले आहेत. आज पेट्रोल डिझेलच्या किंमती प्रति लीटर 25 पैशांनी वधारले आहेत. काल देखील दर एवढेच वाढले होते. त्यामुळे दोन दिवसात 50 पैशांनी पेट्रोल-डिझेल महागले आहे. दरम्यान देशातील महानगरांमध्ये मुंबईमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल 91.32 रुपये डिझेल 81.60 रुपये प्रति लीटर आहे. राजधानी दिल्लीमध्ये देखील गुरुवारी पेट्रोलचे दर 84.70 रुपये आणि डिझेलचे 74.88 रुपये प्रति लीटर आहेत.
दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
काय आहेत महानगरांतील इंधनाचे दर
दिल्ली- पेट्रोल 84.70 रुपये आणि डिझेल 74.88 रुपये प्रति लीटर
मुंबई- पेट्रोल 91.32 रुपये आणि डिझेल 81.60 रुपये प्रति लीटर
कोलकाता- पेट्रोल 86.15 रुपये आणि डिझेल 78.47 रुपये प्रति लीटर
चेन्नई- पेट्रोल 87.40 रुपये आणि डिझेल 80.19 रुपये प्रति लीटर
बंगळुरू- पेट्रोल 87.56 रुपये आणि डिझेल 79.40 रुपये प्रति लीटर
नोएडा- पेट्रोल 84.45 रुपये आणि डिझेल 75.32 रुपये प्रति लीटर
गुरुग्राम- पेट्रोल 82.87 रुपये आणि डिझेल 75.48 रुपये प्रति लीटर
लखनऊ- पेट्रोल 84.36 रुपये आणि डिझेल 75.24 रुपये प्रति लीटर
पाटणा- पेट्रोल 87.23 रुपये आणि डिझेल 80.02 रुपये प्रति लीटर
अशाप्रकारे तपासता येतील पेट्रोल-डिझेलचे नवे दर
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.
Source: https://lokmat.news18.com/money/mumbai-petrol-price-today-14th-january-2021-petrol-disel-rate-across-india-mhjb-513305.html