मुंबई: मुंबईतील जलवाहिन्यांची गळती रोखण्यासाठी महानगर पालिका यंदा तब्बल 129 कोटी रुपये खर्च करणार आहे. सर्वाधिक खर्च अंधेरी पश्चिम,गोरेगाव,मालाड या भागात करण्यात येणार आहे. त्या खालोखाल खर्च ईशान्य मुंबईत होणार आहे.
मुंबईतील गल्ली बोळ्यातील जलवाहिन्यांची गळती रोखणे, नव्या जलवाहिन्या टाकण्या, नव्या जोडण्या देणे अशा कामांसाठी महानगर पालिका वर्षभरासाठी कंत्राटदार नियुक्त करते. या वर्षभरात पालिका या कामावर 129 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यापैकी 10 टक्क्यां पेक्षा जास्त खर्च के पश्चिम अंधेरी जोगेश्वरी पश्चिम, पी दक्षिण गोरेगाव आणि पी उत्तर मालाड या भागात होणार आहे. या तीन प्रभागांसाठी 37 कोटी 15 लाख रुपये महानगर पालिका खर्च करणार आहे. त्या खोलोखाल घाटकोपर, भांडूप आणि मुलूंड या तीन प्रभागात 27 कोटी 51 लाख रुपये खर्च होणार आहे. त्यातच कंत्राटदारांनी पालिकेच्या अंदाजित दरापेक्षा 20 ते 30 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली आहे.
अधिक वाचा- कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत राज्य सरकारच्या अडचणींत वाढ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर न्यायालयाचे ताशेरे
गळती रोखण्याबरोबरच विभागातील महत्वाच्या जलवाहिन्या बदलण्यासाठीही पालिका सुमारे 20 कोटी रुपये खर्च करणार आहे. यात कुर्ला, चेंबूर आणि देवनार, गोवंडी या तीन प्रभागातील 100 ते 300 मि.मी व्यासाच्या नऊ जलवाहिन्या बदलण्यासाठी 4 कोटी 5 लाख रुपये खर्च करणार आहेत. बोरीवली, कांदिवली आणि दहिसर या तीन प्रभागातील 450 ते 1800 मि.मी व्यासाच्या पाच जलवाहिन्या बदलण्यासाठी महानगरपालिका 16 कोटी 2 लाख रुपये खर्च करणार आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जलवाहिन्याची गळती रोखण्यासाठी खर्च
- अंधेरी पश्चिम, गोरेगाव, मालाड – 37कोटी 15 लाख 58 हजार
- घाटकोपर, विक्रोळी – भांडूप, मुलूंड – 27 कोटी 51 लाख 28 हजार
- बोरीवली, कांदिवली, दहिसर – 20 कोटी 74 लाख 02 हजार
- वांद्रे सांताक्रुझ पूर्व, वांद्रे खार पश्चिम, अंधेरी जोगेश्वरी पूर्व – 17 कोटी 06 लाख 28 हजार
———————————–
(संपादन- पूजा विचारे)
Mumbai Bombay Municipal Corporation spend Rs 129 crore revent leakage waterways pipeline
Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-bombay-municipal-corporation-spend-rs-129-crore-revent-leakage-waterways-pipeline