मुंबई बातम्या

स्वच्छतेच्या स्पर्धेसाठी पैसे नाहीत, कोविडमुळे पालिकेचे काटकसरीचे धोरण – Sakal

मुंबई: कोविडच्या उपचारांसह प्रतिबंधावर अनपेक्षित खर्च होत आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे महानगर पालिकेचे उत्पन्नही घटलेले असल्याने आता काटकसरीचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धर्तीवर दर महिन्याला मुंबईची स्वतंत्र स्वच्छता स्पर्धा घेणे शक्‍य नाही, अशी माहिती महानगर पालिका प्रशासनाने महासभेत मांडली आहे.
 
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत दरवर्षी स्वच्छता स्पर्धा घेतली जाते. त्याच धर्तीवर मुंबईसाठी दरमहिन्याला स्वंतत्र स्पर्धा घ्यावी असा ठराव महासभेने जानेवारी 2020 मध्ये मंजूर केला होता. भाजपचे आकाश पुरोहीत यांनी ही ठरावाची सूचना मांडली होती. या ठरावावर प्रशासनाने महासभेपुढे अहवाल सादर केला आहे. 

या ठरावाचे प्रशासनाने कौतूक केले आहे. स्वच्छतेच्या कामांसाठी स्पर्धात्मक योजना राबविणे आवश्‍यक आहे, असे पालिकेने या अहवालात नमूद केले आहे. अशी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करावी लागेल. त्यासाठीच किमान 60 लाख पर्यंतचा खर्च येईल. निव्वळ स्पर्धात्मक कामासाठी कोविड 19 च्या आपत्ती नुरुप काटकसर करण्याच्या पार्श्‍वभूमीवर हा खर्च परडवणार नाही असे सांगत प्रशासनाने हा ठराव निकाली काढला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
स्वच्छतेत घसरता क्रमांक

यंदाच्या वर्षीच्या केंद्र सरकारच्या स्वच्छता स्पर्धेची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षात या स्पर्धेत मुंबईचा क्रमांक घसरत आहे. 2016 मध्ये महापालिकेचा 10 वा क्रमांक आला होता. त्यानंतर 2019 मध्ये हा क्रमांक 49 पर्यंत घसरला आहे. 2017 मध्ये 29 आणि 2018 मध्ये 18 वा क्रमांक होता.
 
मुंबईच्या कचऱ्याची काय परिस्थिती

रोज 6500 ते 6800 मेट्रीक कचरा निर्माण होतो. 
देवनार येथे रोज 1200 ते 1700 मेट्रीक टन कचरा टाकला जातो. 
कांजूरमार्ग येथे 4500 ते 5000 हजार मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. 

कोणता कचरा किती

अन्न,भाजीपाला ओला कचरा – 71.60 टक्के 
राडारोडा – 17.37 टक्के 
प्लास्टिक – 3.24 टक्के 
लाकूड कपडा – 3.51 टक्के 
पुर्नप्रक्रीया होऊ शकल असा कचरा – 3.28 टक्के

———————–

(संपादन- पूजा विचारे)

Bombay muncipal corporation not possible hold independent cleaning competition Mumbai

Source: https://www.esakal.com/mumbai/bombay-muncipal-corporation-not-possible-hold-independent-cleaning-competition-mumbai-384815