मुंबई बातम्या

वर्वरा राव यांना नानावटी रुग्णालयात ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश – Sakal

मुंबईः भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले तेलगु कवी वर्वरा राव यांना 14 डिसेंबरर्यंत नानावटी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

81 वर्षी राव यांना विविध आजार झाले आहेत. त्यातच कोरोना संसर्गातून ते नुकतेच ठीक झाले आहेत. मात्र तळोजा कारागृहात त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार आणि देखभाल केले जात नाही, त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे आणि जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांच्या पत्नीने याचिकेद्वारे केली आहे. राव यांनी देखील जामीनासाठी अर्ज केला आहे. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सध्या राव नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अहवाल आज न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आला. राव यांची प्रकृती सुधारत आहे. त्यामुळे त्यांना 14 डिसेंबरपर्यंत तेथेच ठेवावे, असे निर्देश खंडपीठाने दिले.

अधिक वाचा-  कॉमेडियन भारती सिंह ड्रग्स प्रकरणः NCB चे दोन अधिकारी निलंबित

राज्य सरकार आणि तपास यंत्रणा एनआयएने या वैद्यकीय अहवालाचा अभ्यास करावा, असेही न्यायालयाने निर्देश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी 14 डिसेंबरला निश्चित केली आहे. राव यांच्या विरोधात एनआयएने भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषदबाबत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना जून 2018 मध्ये अटक केले होते. मध्यंतरी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

———————————-

(संपादन- पूजा विचारे)

Bombay High Court orders government keep Varvara Rao in Nanavati Hospital

Source: https://www.esakal.com/mumbai/bombay-high-court-orders-government-keep-varvara-rao-nanavati-hospital-380516