मुंबई बातम्या

२०१५ साली मुंबई- उपनगरात सर्वाधिक मृत्यू प्रमाण, माहिती अधिकारातून बाब उघड – Sakal

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील मृत्यूच्या आकडेवारीची माहिती माहिती आणि अधिकारातून काढण्यात आली. प्राप्त माहिती नुसार, 2015 या वर्षात सर्वाधिक मृत्यूच्या आकडेवारी प्रमाण म्हणजे 7.49 टक्के असल्याचे समोर आले. त्यापूर्वीच्या वर्षात 7 टक्क्यांच्या घरात मृत्यू प्रमाण असून त्यानंतरच्या वर्षात मृत्यू प्रमाण त्याहून कमी असल्याचे आढळून आले. मात्र या 2020 वर्षाच्या ऑगस्ट अखेर पर्यंत मुंबईत मृत्यू 73 हजार 655 झाले असल्याचे समोर आले.

माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी माहिती अधिकारातून सदर माहिती प्राप्त केली. या माहितीनुसार 2011 या वर्षात मृत्यू प्रमाण 7.37 टक्के होते. तर 2012 वर्षात 7.08 टक्के तर 2013 वर्षात 7.13 टक्के, 2014 मध्ये 7.14 टक्के तसेच 2015 वर्षात मृत्यू प्रमाण 7.49 टक्के हे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र त्या नंतर मृत्यू प्रमाण कमी होत जाऊन 2016 मध्ये 6.83 टक्के, 2017 मध्ये 6.99 टक्के, तर, 2018 मध्ये 6.95 टक्के एवढे होते. मुंबई आणि परिसरात 2011 या वर्षी 91 हजार 688 मृत्यू झाले तर 2012 या वर्षात 88 हजार 493 मृत्यू झाले.

अधिक वाचा-  अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात; यंदाही जागा रिक्त राहण्याची शक्यता

तसेच, 2013 वर्षात 89 हजार 493 मृत्यू तर 2014 वर्षात 93 हजार 254 मृत्यू नोंदविण्यात आले. तर, 2015 वर्षात 94 हजार 706 शिवाय, 2016 वर्षात 86 हजार 642 मृत्यू नोंदविण्यात आले. 2017 सालात 89 हजार 037, 2018 वर्षी 88 हजार 852 , 2019 मध्ये 91 हजार 223 तर सध्या सुरु असलेल्या 2020 वर्षाच्या आगस्ट पर्यंत 73 हजार 655 मृत्यू नोंदविण्यात आले.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, 2014 सालात परळ, एल्फिन्स्टन येथे मुंबईत सर्वाधिक मृत्यू झाले. तर , 2015 साली भायखळा, आग्रीपाडा आणि नागपाडा येथे सर्वाधिक मृत्यू झाले. 2017 साली परळ आणि एल्फिन्स्टन परिसरात सर्वाधिक मृत्यू झाले.

—————————–

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai highest number deaths suburbs in 2015 revealed by the Right to Information

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-highest-number-deaths-suburbs-2015-revealed-right-information-379027