पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात बसचा चालक जागीच ठार झाला, तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
हा अपघात आज मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त बस सातारा येथून मुंबईच्या दिशेनं येत होती. पनवेल येथील कोन गावाजवळच्या एक्झिट मार्गावर असताना एका अवजड वाहनाने एसटीला जोरदार धडक दिली. या धडकेत बसचा एका बाजूचा पत्रा कापला गेला. त्यामुळं १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींममध्ये काही महिलांचाही समावेश आहे.
अपघातात बसच्या चालकाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच आयआरबीची यंत्रण व महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आणखी वाचा:
‘…तर १५ डिसेंबरनंतर लोकल, शाळा सुरू होणार’
ठाण्यात कडक प्लास्टिकबंदी! ‘असे’ आहेत नियम
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/one-dead-15-injured-in-st-bus-accident-on-mumbai-pune-express-way/articleshow/79420007.cms