मुंबई: मुंबई पोलिसांनी आणखी एक अभिमानास्पद कामगिरी करुन दाखवली आहे. मुंबईतून एका चार महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. मुंबई पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरवली. पोलिसांनी तपास करताना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्या बाळाची तेलंगणातून सुटका केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 4 लाख रुपयांना बाळाची विक्री करण्यात आली होती. या प्रकरणी एका डॉक्टरसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे मुंबई पोलीस दलाची मान उंचावली आहे. (Mumbai Police rescue for month child and arrested three person)
मुंबई पोलिसांनी तेलंगणातून बाळाची सुटका करुन ते त्याच्या आई वडिलांकडे सोपवले आहे. मुंबई पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात लहान बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलिसांमध्ये दाखल झाली होती. यानंतर पोलिसांनी तपासासाठी पथके स्थापन करुन वेगवान तपासाला सुरुवात केली होती.
पोलिसांनी सीसीटीव्ही पडताळणी केल्यानंतर पुरावे हाती लागले. त्याआधारे ते बाळ तेलंगणामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेलंगणात जाऊन बाळाची सुटका केली आणि आरोपींना अटक केली आहे.
जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पंढरीनाथ ओव्हाळ यांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती दिली. मुख्य आरोपी डॉ. नसरुद्दीन बशीरुद्दीन यांनी महेश दिट्टी आणि रमेश नावाच्या व्यक्तीला बाळाचे अपहरण करण्यास सांगितले होते. या सर्व आरोपींनी या बाळाची मुल नसणाऱ्या एका व्यक्तीला चार लाख रुपयांना विक्री केली होती. जुहू पोलिसांनी सर्व आरोपींवर अपहरण, मानवी तस्करी आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी विविध कलमांखाली अटक केली आहे. जुहू पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
दीड वर्षांपासून लपाछपीचा खेळ, नागपूर पोलिसांनी वाँटेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या, 20 लाखांचं चोरी केलेलं सोनं जप्त
पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची लूट; 55 हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
(Mumbai Police rescue for month child and arrested three person)
कमेंट करा
Source: https://www.tv9marathi.com/crimes/mumbai-police-rescue-for-month-child-and-arrested-three-person-319789.html