मुंबईःमुंबई लोकल पुन्हा कधी सुरू होणार? हा प्रश्न सध्या सातत्याने सर्व स्तरातून विचारला जात आहे. त्यामुळं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज मुंबई लोकलबाबत काय निर्णय घेतायत याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. पण, इतक्यात तरी मुंबई लोकल पूर्ण क्षमतेनं सुरू होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. त्यावेळी मुंबई लोकल कधी सुरू होणार याविषयी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘राज्यांतर्गंत रेल्वेची वाहतूक सुरू केली आहे. हळूहळू काही गोष्टी सुरु केल्या आहेत. लोकलसाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. कारण मला गर्दी नकोय. सगळ्यांनाच लोकलनं जायचंय. लोकलची संख्या वाढल्यानंतर आपण त्यातून अधिक लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ. राज्यांतर्गंत हरिद्वारपर्यंत वाहतूक सुरू झाली आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गमध्ये होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
जिमबाबत चर्चा सुरू
जिम सुरू करण्याबाबत संबंधितांशी चर्चा सुरू आहे. जिमसाठी नियमावली आवश्यक आहे त्याविषयी बोलण सुरु आहे. असं सांगतानाच जीम इतक्यात सुरू होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
मुंबईची स्थिती सुधारतेय; करोना रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतेय
फेसबुक लाइव्हमधील महत्त्वाचे मुद्दे
>> आता नवरात्री येत आहे, त्यानंतर दिवाळी आहे. खूप काळजीपूर्वक एक-एक पाऊल टाकावे लागणार आहे. उघडलेल्या दरवाजातून सुबत्ता, समृद्धी आली पाहिजे, करोना नको, तरच त्या उघडलेल्या दरवाजाला अर्थ आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मंदिर उघडण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे
>> ७० ते ८० टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. तसंच, ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत त्यांना करोनाचा धोका जास्त आहे. त्यांच्यासाठी अनेक सोयीसुविधा आहेत.
>> जे सुरू केलं ते पुन्हा बंद करावं लागू नये म्हणून खबरदारी घ्यावी लागेल. पुन्हा लॉकडाऊन करावा लागणार नाही. याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ज्या प्रमाणे आतापर्यंत सहकार्य केलं तसं यापुढेही करायचं आहे.
>> केंद्रीय कृषी धोरणाबाबत नीट विचार करुन निर्णय घएणार. वेगवेगळ्या कृषी संस्थांशी बोलणं सुरू आहे.
३० हजार कोटींचा टीआरपी घोटाळा; आता पोलिसांचे पाय कोणी मागे खेचू नयेः संजय राऊत
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cm-uddhav-thackeray-talking-about-reopening-gym-and-mumbai-local/articleshow/78602289.cms