अबुधाबी : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तब्बल पाच वर्षानंतर राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) विजय मिळवला आहे. मुंबईने राजस्थानवर 57 धावांनी विजय मिळवला आहे. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 194 धावांचे आव्हान दिले होते. मात्र राजस्थानला 136 धावाच करता आल्या. राजस्थानच्या पहिल्या 4 फलंदाजांपैकी 2 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर संजू सॅमसनने 6 धावा केल्या. राजस्थानला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आल्या नाही. राजस्थानने 18.1 ओव्हरमध्ये 136 धावा केल्या. राजस्थानकडून जॉस बटलरने सर्वाधिक धडाकेबाज 70 धावा केल्या. तर मुंबईकडून जस्प्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. (IPL 2020 Mumbai Indians Beat Rajasthan Royals By 57 Run)
And, that’s the match here in Abu Dhabi.
A comprehensive victory for @mipaltan as they win by 57 runs.#Dream11IPL #MIvRR pic.twitter.com/fOLF7GPswN
— IndianPremierLeague (@IPL) October 6, 2020
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या राजस्थानची खराब सुरुवात झाली. राजस्थानने पहिल्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट गमावली. यशस्वी जयस्वाल बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये कर्णधार स्टीव्ह स्मिथ 6 धावांवर आऊट. स्टार खेळाडू संजू सॅमसन या सामन्यातही अपयशी ठरला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर महिपाल लोमरुर 11 धावांवर बाद झाला. त्यामुळे राजस्थानची 42-4 अशी अवस्था झाली.
मात्र यानंतर जॉस बटलरने फटकेबाजी करत राजस्थानला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जॉस बटलरही मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅचआऊट झाला. त्याने राजस्थानकडून सर्वाधिक 70 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 सिक्स आणि 4 फोर लगावले. बटलर बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव घसरला. बटलरनंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सनने प्रत्येकी 2 विकेट घेत बुमराहला चांगली साथ दिली.
त्याआधी मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईची चांगली सुरुवात झाली.मुंबईने पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. क्विंटन डी कॉकच्या रुपात मुंबईला पहिला धक्का लागला. क्ंविटन डी कॉक 23 धावांवर बाद झाला. यानंतर मुंबईने 88 धावांवर एकामागोमाग एक असे दोन विकेट्स गमावले. श्रेयस गोपाळने मॅचच्या 10 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि कृणाल पांड्याला आऊट केले. रोहितने 35 तर कृणालने 12 धावा केल्या. दोन्ही खेळाडू आऊट झाल्याने मुंबईचा संघ अडचणीत सापडला.
मात्र सूर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सावरला. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. सूर्यकुमारने नाबाद 79 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने नाबाद 30 धावांची उपयुक्त खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्मानेही 35 धावा केल्या. राजस्थानकडून श्रेयस गोपाळने 2 विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चर आणि कार्तिक त्यागीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
राजस्थान प्लेइंग इलेव्हन
Match 20. Rajasthan Royals XI: J Buttler, S Smith, S Samson, Y Jaiswal, M Lomror, R Tewatia, J Archer, T Curran, S Gopal, A Rajpoot, K Tyagi https://t.co/vWqg3i1hRI #MIvRR #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 6, 2020
06/10/2020,7:16PM
मुंबईचे अंतिम 11 खेळाडू
Match 20. Mumbai Indians XI: R Sharma, Q de Kock, S Yadav, I Kishan, H Pandya, K Pollard, K Pandya, J Pattinson, R Chahar, T Boult, J Bumrah https://t.co/vWqg3i1hRI #MIvRR #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 6, 2020
06/10/2020,7:16PM
Will it be three wins a row for #MI today or will #RR stop their two-match losing streak in Abu Dhabi ?
Here’s our preview for Match 20 – by @ameyatilak https://t.co/8ix6aYVdjW #Dream11IPL #MIvRR pic.twitter.com/fSg09dgfKm
— IndianPremierLeague (@IPL) October 6, 2020
दोन्ही संघ तुल्यबळ
आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 20 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 10 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, इशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरन पोलार्ड, कृणाल पंड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.
राजस्थान रॉयल्स : जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टीवन स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय, महिपाल लोमरुर, ओसाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण आरोन, टॉम कुरन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.
संबंधित बातम्या :
IPL 2020 | “इट शूड बी असा पाय पडला पाहिजे”, श्रीरामपूरच्या झहीरचे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना मराठीत धडे
Mankading | पहिलं आणि शेवटचं सांगतोय, नंतर मंकडिंगसाठी बोल लावू नका, अश्विनची फलंदाजांना तंबी
IPL 2020, RCB vs DC : विराटची ‘विराट’ कामगिरी, ठरला पहिला भारतीय फलंदाज
(IPL 2020 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Score Update)
कमेंट करा
Source: https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-mi-vs-rr-live-score-update-today-cricket-match-mumbai-indians-vs-rajasthan-royals-279979.html