मुंबई बातम्या

IPL 2020, KXIP vs MI, Live Score : किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स लाईव्ह – TV9 Marathi

अबुधाबी : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings Eleven Punjab) 48 धावांनी पराभव केला आहे. मुंबईने पंजाबला विजयासाठी 192 धावांचे आव्हान दिले होते. या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना पंजाबला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 44 धावा केल्या. मुंबईकडून जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. (Mumbai Indians Beat Kings Eleven Punjab By 48 Run)

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या पंजाबची चांगली सुरुवात झाली. पहिली विकेटसाठी कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल या दोघांनी 38 धावा जोडल्या. मयंक अगरवालच्या रुपात पंजाबला पहिला धक्का लागला. यानंतर ठराविक अंतराने पंजाबने विकेट्स गमावले. कर्णधार केएल राहुलला या सामन्यात विशेष काही करता आले नाही. निकोलस पूरनचा अपवाद वगळता मध्यक्रमातील फलंदाजांनी निराशा केली. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 44 धावा केल्या. मयंक अगरवालने 25 तर क्रिष्णप्पा गौथमने 22 धावा केल्या. मुंबईकडून
जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट आणि कृणाल पांड्या या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्याआधी पंजाबने टॉस जिंकला. पंजाबने मुंबईला फलंदाजीसाठी भाग पाडले. मुंबईची वाईट सुरुवात झाली. मात्र कर्णधार रोहित शर्माने मुंबईचा डाव सावरला. रोहितने सर्वाधिक 70 धावा केल्या. तर अखेरच्या 4 षटकात किरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी केली. किरन पोलार्डने नाबाद 47 तर हार्दिक पांड्याने नाबाद 30 धावा केल्या. पंजाबकडून शेल्डॉन कॉट्रेल, मोहम्मद शमी आणि क्रिष्णप्पा गौथमने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

पंजाबची 19 ओव्हरनंतर धावसंख्या

01/10/2020,11:19PM

पंजाबला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 71 धावांची आवश्यकता

01/10/2020,11:08PM

पंजाबला विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 87 धावांची गरज

01/10/2020,10:50PM

पंजाबला विजयासाठी 7 ओव्हरमध्ये 93 धावांची गरज

01/10/2020,10:42PM

पंजाबला विजयासाठी 8 ओव्हरमध्ये 98 धावांची गरज

01/10/2020,10:37PM

पंजाबला विजयासाठी 10 ओव्हरमध्ये 120 धावांची आवश्यकता

01/10/2020,10:26PM

पंजाबची 9 षटकांनंतर धावसंख्या

01/10/2020,10:22PM

पंजाबच्या डावाला सुरुवात

01/10/2020,9:38PM

मुंबईकडून पंजाबला विजयासाठी 192 धावांचे आव्हान

01/10/2020,9:23PM

हार्दिक पांड्या-किरन पोलार्ड यांच्यात अर्धशतकी भागीदारी

01/10/2020,9:22PM

17 षटकांनंतर मुंबईची धावसंख्या

01/10/2020,9:06PM

मोहम्मद शमीने रोहितला बाद करत मिळवली पर्पल कॅप

01/10/2020,9:02PM

हिटमॅनचे अर्धशतक पूर्ण

01/10/2020,8:49PM

[/svt-event]

रोहित शर्मा-इशान किशनमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

01/10/2020,8:25PM

रोहित शर्मा- इशान किशनने मुंबईचा डाव सावरला

01/10/2020,8:11PM

मुंबईच्या 50 धावा

7.4 ओव्हरनंतर मुंबईच्या 50 धावा पूर्ण

01/10/2020,8:09PM

पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये मुंबईच्या धावा

01/10/2020,8:01PM

मुंबईला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव रनआऊट

01/10/2020,7:50PM

मुंबई 3 ओव्हरनंतर

मुंबई 18-1 (3 over) सूर्यकुमार यादव – 9*, रोहित शर्मा – 9*

01/10/2020,7:47PM

मुंबई 2 ओव्हरनंतर

मुंबई 8-1 (2 over) सूर्यकुमार यादव – 0*, रोहित शर्मा – 8*

01/10/2020,7:40PM

हिटमॅन रोहितच्या 5000 धावा

रोहित शर्माच्या आयपीएलमध्ये 5000 हजार धावा पूर्ण. ठरला तिसरा भारतीय खेळाडू

01/10/2020,7:36PM

मुंबई 1 ओव्हरनंतर

IPL 2020, KXIP vs MI, Live Score : मुंबई 0-1 (1 over) सूर्यकुमार यादव – 0*, क्विटंन डी कॉक – 0*

01/10/2020,7:35PM

मुंबईची खराब सुरुवात

मुंबईची खराब सुरुवात, क्विटंन डी कॉक भोपळा न फोडता माघारी

01/10/2020,7:34PM

दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू

01/10/2020,7:22PM

मुंबईचे 11 खेळाडू

01/10/2020,7:22PM

पंजाबचे अंतिम 11 खेळाडू

01/10/2020,7:18PM

पंजाबमध्ये एक बदल

01/10/2020,7:15PM

संबंधित बातम्या :

IPL 2020 | “इट शूड बी असा पाय पडला पाहिजे”, श्रीरामपूरच्या झहीरचे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना मराठीत धडे

LPL | श्रीलंकेला IPL चा फटका, लंका प्रीमियर लीग पुन्हा पुढे ढकलण्याची वेळ

(Mumbai Indians Beat Kings Eleven Punjab By 48 Run)

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-kxip-vs-mi-live-score-update-today-cricket-match-kings-eleven-punjab-vs-mumbai-indians-live-276447.html