मुंबई बातम्या

पूनम पांडे व सॅम बॉम्बे पुन्हा ‘साथ साथ’; ‘बिग बॉस’साठी केले होते भांडणाचे नाटक? – Lokmat

ठळक मुद्देयाच महिन्यात पूनम पांडे  आपला बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नाचे फोटो शेअर करुन पूनमने लग्नाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती.

बोल्ड फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 9 सप्टेंबरला  पूनमने बॉयफ्रेन्ड सॅम बॉम्बेसोबत लग्न केले आणि हनीमूनवर असतानाच दोघांमध्ये असा काही वाद झाला की, प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. या वादानंतर आता मी कधीच पतीकडे परत जाणार नाही, असे पूनम म्हणाली होती. पण कदाचित आता हे भांडण मिटले आहे.
अगदी हनीमूनवर असतानाच पूनमने पतीविरोधात विनयभंग व मारहाणीची तक्रार केली होती. पाठोपाठ पूनमच्या पतीला पोलिसांनी अटकही केली होती. अर्थात काहीच तासांत तो जामीनावर सुटला होता. यानंतर पूनमने पतीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. पण आता सगळे काही पूर्ववत झाले आहे. ‘ई टाईम्स’ला पूनमने खुद्द याची माहिती दिली आहे.
आता आमच्यात सगळे काही ठीक आहे. आम्ही एक नवी सुरुवात करणार आहोत.आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो़ एकमेकांच्या प्रेमात आम्ही वेडे आहोत. लग्नात अशा तक्रारी, भांडणं होतातच, असे ती म्हणाली.
तुमच्यात भांडणात कुटुंबाने मध्यस्थी केली का? असे विचारले असता, आम्ही आमच्याच स्तरावर वाद निकाली काढला. कुटुंब महत्त्वाचे आहे़ आता आम्ही पुन्हा सोबत आहोत, असे ती म्हणाली.
यादरम्यान सॅमनेही त्यांच्यात सगळे काही सुरळीत झाल्याचे सांगितले. आम्ही लवकरच मुंबईला परतणार आहोत. पूनम खूप आनंदी आहे, असेही तो म्हणाला.

‘बिग बॉस 14’ साठी केले नाटक?
 पूनम पांडे व सॅम यांच्यातील भांडण मुळात एक नाटक होते. केवळ बिग बॉस 14 मध्ये जाण्यासाठी दोघांनी नाटक केले, असे लोकांचे मत आहे. मात्र पूनमने हे आरोप नाकारले. अजिबात नाही. मी बिग बॉस 14 मध्ये जातेय, ही बातमीही खोटी आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी मी खूप लहान आहे़, असे पूनम म्हणाली.

तो माझे बोल्ड फोटो व व्हिडीओ विकतो आणि पैसे कमवतो…
मारहाण व विनयभंगाच्या तक्रारीनंतर पूनमने पती सॅम बॉम्बेबद्दल एकापाठोपाठ एक खुलासे करण्याचा धडाका लावला होता.
होय, तो माझे बोल्ड फोटो व व्हिडीओ विकतो आणि पैसे कमवतो, असे पूनमने म्हटले होते.
‘ गेल्या दीड वर्षांत माझ्यासोबत नाही नाही ते घडले. मी काय त्रास भोगला ते मलाच माहित. माझ्याबद्दल सगळे वाईट लिहितात, बोलतात. लग्नानंतर तरी सगळे काही ठीक होईल, असे मला वाटले होते. पण हनीमूनवर असताना त्याने हॉटेलातच मला जनावरांसारखे बदडले. लग्नाआधीही त्याने  त्याने मला अनेकदा मारहाण करत हॉस्पीटलमध्ये जाण्यास भाग पाडले. तो खूप जास्त पजेसिव्ह आह.
त्या दिवशी हॉटेलात त्याने मला मारले. खरे तर मी पोलिसांत गेलेच नव्हते. माझी स्थिती बघून हॉटेलच्या स्टाफने पोलिसांना बोलवले होते. माझा चेहरा सुजलेला होता. शरीरावर खुणा होत्या. त्याच्या मारहाणीला कंटाळून मी पोलिसांत त्याच्याबद्दल तक्रार नोंदवली. प्रत्येकवेळी तो मारहाण करतो. मग पश्चातापाने रडतो, माफी मागतो. गयावया करतो आणि मी प्रत्येकवेळी त्याला माफ करते, असेही पूनमने सांगितले होते.

त्याच्याकडे कधीच  परत  जाणार नाही…
 
मारहाणीनंतर पूनमने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितल होते.मी हे नाते जपण्याचा खूप प्रयत्न केला. पण आता मला सॅमकडे परत जायचे नाही, असे पूनमने म्हटले होते.त्याने माझा गळा घोटण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी आता मी मरणार, असे मला वाटले होते.

त्याने चेह-यावर मारले, माझे केस ओढले. माझे डोके बेडच्या कॉर्नरवर आपटले. कसाबसा मी माझा जीव वाचवला आणि खोलून पळाले. हॉटेल स्टाफने पोलिसांना बोलवले आणि ते त्याला घेऊन गेले. यानंतर मी पोलिसांत तक्रार दाखल केली. यावेळी मी त्याच्याकडे परत जाणार नाही. ज्याने तुम्हाला जनावरासारखे मारले, त्याच्याकडे परत जाणे योग्य निर्णय असूच शकत नाही, असे ती म्हणाली होती.
याच महिन्यात पूनम पांडे  आपला बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नाचे फोटो शेअर करुन पूनमने लग्नाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. शिवाय गोव्याला हनिमूनला जाण्यापूवीर्चेही फोटो तिने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते. 

त्याने मला जनावरासारखे मारले…; लग्नानंतर 14 दिवसांतच पूनम पांडेने घेतला पतीला सोडण्याचा निर्णय

imageवाचकहो, ‘लोकमत CNX Filmy’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: poonam pandey and husband sam bombay are back together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://m.lokmat.com/bollywood/poonam-pandey-and-husband-sam-bombay-are-back-together-a590/