कृष्णात पाटील / मुंबई : महापालिकेच्या सुधार समिती सदस्य निवडीवरून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस दिसून येत आहे. मुंबई अध्यक्ष आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या यादीतील नावांवर फुली मारून गटनेत्या राखी जाधव यांनी दुस-यांचीच वर्णी लावल्याने पक्षात नाराजीनाट्य रंगले आहे.
नगरसेवक कप्तान मलिक यांना सुधार समितीवर घेण्यास सांगितले असतानाही त्यांच्याऐवजी मनिषा रहाटे यांचे नाव दिल्याने कप्तान मलिक हे नाराज आहेत. राखी जाधव मनमानी कारभार करत असल्याचा कप्तान मलिक यांनी आरोप केला आहे. याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे कप्तान मलिक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कप्तान मलिक हे नवाब मलिक यांचे बंधू आहेत. त्यामुळे मंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या यादीतील नावांवर फुली मारल्याने ही नाराजी पसरली आहे. तर मुंबई अध्यक्षांचे न ऐकता राखी जाधव मनमानी कारभार करत असल्याचा आरोप कप्तान मलिक यांनी केला आहे. मुंबई अध्यक्ष आणि नगरसेवक कप्तान मलिक यांना सुधार समितीवर घेण्यास सांगितले असतानाही त्यांच्याऐवजी मनिषा रहाटे यांचे नाव दिल्याने कप्तान मलिक नाराज झाले आहेत.
6
Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/dissatisfaction-in-mumbai-nationalist-congress-party/536516