सोमवारी रात्री पतीने मारहाण केली
पोलिसांना दिलेल्या जबाबात पूनम पांडे दक्षिण गोव्यातील कानाकोना गावात एका सिनेमाचं चित्रीकरण करत होती. त्यावेळीच हा सर्व प्रकार घडला. कानाकोना पोलीस ठाण्याचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनमने सोमवारी रात्री तिच्या नवऱ्याने विनयभंग करून मारहाण केल्याची तक्रार केली. इतकंच नाही तर सॅम बॉम्बेने या सर्वाची किंमत चुकवावी लागेल अशी धमकीही दिल्याचंं पूनम म्हणाली.
सॅम बॉम्बेची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार
पूनमच्या तक्रारीनंतर तिचा नवरा सॅम बॉम्बे याला अटक करण्यात आली आहे. आता त्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे, त्यानंतर सॅमला न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, १० सप्टेंबरला दोघांनी लग्न केल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. यानंतर पूनम आणि सॅमला मुंबई विमानतळावर पाहण्यात आले होते. दोघं हनिमूनसाठी गोव्याला जात होते.
Source: https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/poonam-pandey-husband-sam-bombay-arrested-in-goa-for-molestation/articleshow/78268725.cms