मुंबई बातम्या

MI vs CSK IPL 2020: मुंबई विरुद्ध चेन्नई… कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी – Maharashtra Times

अबूधाबी: (Mumbai Indians Vs Chennai Super Kings) गेल्या सहा महिन्यांपासून क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते तो वाट आज रात्रीपासून संपणार आहे. करोना व्हायरसमुळे जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा निश्चित केलेल्या वेळापेक्षा सहा महिने उशिरा तेही भारताबाहेर होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना शेख जायद स्टेडियमवर होणार आहे. गत विजेते मुंबई इंडियन्स (MI) आणि उप विजेते चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात पहिली लढत होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघात कोणत्या खेळाडूंनी संधी दिली जाईल आणि हवामान तसेच खेळपट्टी अशी असेल ते जाणून घेऊयात…

वाचा- IPLचा धमाका आजपासून; मुंबई विरुद्ध चेन्नई, हे आहेत विजयाचे फॅक्टर

असे आहे अबूधाबीतील हवामान

भारतीय वेळानुसार रात्री साडेसात वाजता सामना सुरू होईल. तेव्हा युएईमध्ये संध्याकाळचे सहा वाजलेले असतील. तेव्हा युएईमध्ये खेळाडूंना उष्णतेचा फार त्रास होणार नाही. त्यावेळी तापमान ३० डिग्रीच्या आसपास असेल आणि सामना संपेल तेव्हा २९ डिग्रीच्या खाली असेल.

वाचा- १४ महिन्यांनी धोनी क्रिकेट खेळणार; पहिल्या सामन्यात विक्रम मोडण्याची संधी

पिच रिपोर्ट

शेख जायद स्टेडियवर सीमा रेषा थोडी दूर आहे. याचा अर्थ फलंदाजांना धावा काढण्यासाठी अधिक पळावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मैदानावरील खेळपट्टी पूर्ण स्पर्धेसाठी एकसारखीच राहणार आहे. ही खेळपट्टी फलंदाज आणि जलद गोलंदाजांना अधिक मदत करणारी ठरणार आहे. खेळाडूंना त्यांच्या कौशल्याच्या आधारावर खेळ करता येईल.

वाचा- ‘हा’ आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा…

असा असेल संभाव्य संघ-

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक(विकेटकिपर), इशान किशन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, नाथन कुल्टर नाइल राहुल चाहर, जसप्रित बुमराह आणि ट्रेंट बोल्ट

वाचा- करोनामुळे बदलले आहेत IPLचे हे ६ नियम; जाणून घ्या…

चेन्नई सुपर किंग्ज- महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), शेन वॉट्सन, अंबाती रायडू, फाफ डुप्लिसिस, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, पीयुष चावला, दीपक चाहर आणि इमरान ताहिर.

IPL मधील ‘हे’ १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का?

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/opening-match-ipl-2020-mumbai-indians-vs-chennai-super-kings-team-prediction-and-pitch-report/articleshow/78200539.cms