मुंबई : अभिनेत्री कंगनाच्या मुंबईतील पाली हिल ऑफिसवर मुंबई महापालिका कारवाई करण्यासाठी दाखल झाली आहे. मुंबईला काल मंगळवारी बीएमसीने नोटीस बजावली होती आणि २४ तासात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. पण २४ तासात कंगनाने उत्तर न दिल्याने मुंबई महापालिकेचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी दाखल झाली आहे. कंगनाच्या ऑफिसबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री कंगनाला शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारशी पंगा घेणं महागात पडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि कंगना यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. आज कंगना मुंबईत दाखल होत आहे. त्यासाठी ती हिमाचल येथून निघाली आहे. कंगनाला देखील कारवाईची माहिती मिळाली आहे. कंगनाच्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितली होती. पण बीएमसीने ही मागणी फेटाळली आहे.
कंगनाने ट्विट करत म्हटलं की, ‘माझ्या येण्याच्या आधीच महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे गुंडे माझ्या ऑफिसच्या बाहेर पोहोचले आहे. आणि ऑफिस तोडण्याची तयारी करत आहेत.’
शिवसेने नेत्यांकडून आक्रमक वक्तव्यानंतर कंगनाला केंद्र सरकारने Y श्रेणीची सुरक्षा दिली आहे. त्यामुळे कंगना सोबत मुंबईत तिच्या संरक्षणासाठी जवान देखील उपस्थित असतील. ही कारवाई सुडबुद्धीने होत असल्याचं कंगनाने म्हटलं आहे.
Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/bmc-taken-action-on-actress-kanganas-office/534184