मुंबई, ठाण्यात मेघगर्जना, पाहा महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज & | & फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
- मुंबई, ठाण्यात ढगाळ वातावरण
- पुढील काही तासांत मुंबई, ठाणे परिसरात पावसाचा अंदाज
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) परिसरात विश्रांती घेतलेला पाऊस आज पुन्हा हजेरी लावणार असल्याचं दिसत आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पुढील काही तासांत पाऊस (Rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. मुंबई, ठाण्यासोबतच नाशिक (Nashik) आणि जुन्नर (Junnar) परिसरातही मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
६ ते ९ सप्टेंबर या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राष्ट्रीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुढील हवामानाचा अंदाज
- ६ सप्टेंबर – कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
- ७ सप्टेंबर – कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
- ८ – ९ सप्टेंबर – कोकण, गोवा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
हवामान खात्याने दिलेला इशारा
- ६ सप्टेंबर – मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.
- ७ सप्टेंबर – कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- ८- ९ सप्टेंबर – विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज
- ६ सप्टेंबर – मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. (घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)
- ७ सप्टेंबर – हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. (घाट विभागात तुरळख ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)
- ८ सप्टेंबर – हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
- ९ सप्टेंबर – हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
- १० सप्टेंबर – हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
- ११ सप्टेंबर – हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज
- ६ सप्टेंबर – मुंबई शहर, उपनगरात संध्याकाळी/रात्री आकाश अंशत: ढगाळ राहून गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
- ७ सप्टेंबर – मुंबई शहर, उपनगरात संध्याकाळी/रात्री आकाश अंशत: ढगाळ राहून गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/maharashtra-weather-forecast-imd-predicts-mumbai-radar-indicates-thunderstorm-possibilities-of-mod-rains/311481