मुंबई : प्रियकराविरुद्ध बलात्काराची खोटी एफआयआर नोंदवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एका तरुणीला नुकताच २५ हजार रुपयांचा दंड लावला आहे. दंडाची ही रक्कम महाराष्ट्र पोलिस कल्याण निधीत चार आठवड्यांमध्ये जमा करण्याचा आदेशही न्यायालयाने तिला दिला आहे.
‘आरोपीने मला अंमलीपदार्थाचे सेवन करायला लावून माझ्यावर बलात्कार केला’, अशी तक्रार या तरुणीने नालासोपारा पोलिस ठाण्यात नोंदवली होती. पोलिसांनी त्यावरून १६ मार्चला एफआयआर दाखल केला होता. मात्र, हा एफआयआर रद्द करावा, अशा विनंतीची याचिका तक्रारदार तरुणीनेच मागील महिन्यात उच्च न्यायालयात केली. ‘आरोपीशी माझे प्रेमसंबंध आहेत. मात्र, कुटुंबीयांना त्याविषयी कळल्यानंतर त्यांच्या दबावामुळे मी खोटी कहाणी रचली आणि बलात्काराविषयीची तक्रार नोंदवली’, असे म्हणणे तरुणीच्या वकिलांनी न्या. आर. डी. धनुका व न्या. व्ही. जी. बिश्ट यांच्या खंडपीठासमोर ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या सुनावणीत मांडले. मात्र, ‘पोलिस याप्रकरणी तपास करत असून, आरोपीविरोधात आरोपपत्रही दाखल केले जाणार आहे. मात्र, न्यायालय एफआयआर रद्द करण्याचा विचार करत असेल, तर याचिकादाराला जबर दंड लावायला हवा’, असे म्हणणे सरकारी वकील अरुणा कामत यांनी मांडले. खंडपीठाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला.
आणखी बातम्या वाचा:
जेवताना पाणी दिलं नाही; पतीने केलेल्या मारहाणीत गर्भवती पत्नीचा मृत्यू
संतापजनक! गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
गुटखा खाताना पत्नीनं हटकलं; पतीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या
‘त्या’ निर्दयी महिलेची जन्मठेप कायम, पण ११ वर्षांपासून आहे फरार
महिलेवर मित्रासह तिघांनी केला सामूहिक बलात्कार
Source: https://maharashtratimes.com/crime-news/bombay-high-court-imposed-fine-of-rs-25000-on-woman-for-filing-false-rape-complaint-against-boyfriend/articleshow/77826172.cms