मुंबई बातम्या

मुंबईतील डब्बेवाल्यांची सरकारकडे मागणी; अत्यावश्यक सेवा मानून ट्रेनमधून प्रवासास मुभा द्या, नाहीतर – Sakal

मुंबई : मुंबई, देशाची आर्थिक राजधानी. गेले काही महिने लॉकडाऊनमुळे आर्थिक राजधानी मुंबई स्लो-डाऊन झालीये. कोरोनामुळे सर्व काही ठप्प असल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. अनेकांची पगार कपात अद्यापही सुरु आहे. अशात आता मुंबईने अनलॉकच्या दिशेने कूच केलीये. आता मुंबईतील सरकारी आणि कॉर्पोरेट ऑफिसेस हळू-हळू सुरु होतायत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील डब्बावाल्यांनी सरकारकडे महत्त्वाची मागणी केलीये. 

गेल्या तब्बल साडे पाच महिन्यांपासून अधिक काळ मुंबईतील डब्बेवाल्यांची सेवा बंद आहे. त्यामुळे मुंबईतील प्रसिदध डब्बेवाल्यांची आर्थिक परिस्थितीत ढासळली आहे. ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीशी सामना करण्यासाठी डब्ब्यांचा व्यवसाय सुरु करण्याची गरज आहे. मुंबई हळू-हळू पूर्वपदावर येतानाची चिन्ह आहेत. अशात ऑफिसमध्ये जाणारे कर्मचारी जेवणाच्या डब्ब्यांची विचारणाही करू लागलेत. मात्र मुंबईतील जीवनवाहिनी म्हणजेच मुंबईची उपनगरीय लोकल सेवा जोवर सुरु होत नाही तोवर मुंबईच्या डब्बेवाल्यांना आपली सेवा सुरु करता येणार नाहीये. 

मोठी बातमी – “बबड्याच्या हट्टापायी” या ट्विटनंतर रोहित पवारांचं आशिष शेलार यांना जशास तसं उत्तर

दरम्यान, या पार्श्वभूमीवर डब्बेवाल्यांकडून सरकारकडे लोकलने जेवणाच्या डब्ब्यांची ने आण करण्यास अत्यावश्यक सेवा मानून रेल्वेने प्रवास करण्याची अनुमती द्यावी किंवा जोपर्यंत लोकल ट्रेन सुरु होणार नाहीत तोवर डब्बेवाल्यांना महिना तीन हजार रुपये अनुदान द्यावं अशी मागणी केली आहे. 
          
मुंबईकर काम-धंद्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास लोकल ट्रेनचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र ट्रेनमध्ये होणारी गर्दी पुन्हा एकदा कोरोना पसरवू शकते. म्हणूनच मुंबईतील लोकल ट्रेशन अद्याप सुरु करण्यात आलेल्या नाहीत. सप्टेंबरच्या पहिल्या महिन्यात अनलॉक च्या दिशेने आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तयामध्ये प्रामुख्याने ट्रेन सुरु करण्याबाबत विचार केला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

dabbavala association demands travel permission by mumbai locals for resuming business 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title:

dabbavala association demands travel permission by mumbai locals for resuming business

Source: https://www.esakal.com/mumbai/dabbavala-association-demands-travel-permission-mumbai-locals-resuming-business-339430