मुंबई बातम्या

गणेशोत्सवावर अस्मानी संकट, मुंबई ठाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता – Sakal

मुंबईः गेल्या दोन आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम आहे.  जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसानं ऑगस्टमध्ये जोरदार बँटिग सुरू केली. दरम्यान येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात मुंबई, ठाणे शहरांमध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे. 

आज उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर हे क्षेत्र पुढच्या 24 तासांत अधिक तीव्र होण्याची आणि पुढच्या 3-4 दिवसांत पश्चिमेकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 4-5 दिवसांत गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा सर्वत्र मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

हेही वाचाः मुंबईच्या मृत्यूदराबाबत धक्कादायक माहिती आली समोर; देवेंद्र फडणवीसांनी केली पुन्हा तीच मागणी

नैऋत्य मौसमी वारे सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सक्रीय आहे. त्यामुळं या भागात पावसाचा मुक्काम लांबला आहे. यामुळे येत्या आठवड्यातही पाऊस राज्यात सक्रिय असेल असा अंदाज आहे. कोकण आणि घाट भागात दाट ढग आल्यानं घाट भागात (सातारा, पुणे) या भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज आहेत. तर, मराठवाड्यात पुर परिस्थितीची शक्यता असल्यातं, हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

अधिक वाचाः  कर्करोगाच्या रुग्णांची कोरोनावर मात, 300 हून अधिक कर्करोगग्रस्त कोरोनातून बरे

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसानं जोर धरला आहे. कोल्हापूरसह काही ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली आहे. राज्यात सरासरीपेक्षा 8 टक्के इतका जास्त पाऊस झाला. मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के पाऊस पडला आहे. महिन्याला सरासरी ५८५.२ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३५७ मिमी पाऊस पडल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे. तसंच पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसानं मुंबईची तुंबई झाली होती. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं.

Mumbai Heavy rain next 3 days red alert weather forecast

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-heavy-rain-next-3-days-red-alert-weather-forecast-335338