मुंबई: १७ वर्षीय मुलीचा पाठलाग आणि तिला मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी मुंबईतील पवई पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी या दोन तरुणांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या पालकांनी गेल्या आठवड्यात या दोन तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपींपैकी एक तरूण मुलीचा कॉलेजपर्यंत पाठलाग करत असून, तिच्या मोबाइलवर अश्लील मेसेज देखील पाठवतो, अशी तक्रार पालकांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून तरुणांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या दोघांना अटक केली आहे. क्राइम ब्रँच पोलिसांनी या दोघांना पवई पोलिसांच्या ताब्यात दिले. कोर्टात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
भयानक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार; सिगारेटचे दिले चटके
मुंबई: बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; पोलिसांवर कारवाई
मोबाइलवर व्हिडिओ बघताना अंगावर केली लघुशंका; मित्राची केली हत्या
काही दिवसांपूर्वी पुण्यातील पिंपरी परिसरात अशीच एक घटना घडली होती. एक तरूण महिनाभर एका महिलेचा पाठलाग करत होता. तसेच आरोपीने तिला अडवून तिच्याकडील मोबाइल हिसकावून पळ काढला होता. अखेर त्रासाला कंटाळून या महिलेने पोलिसांत धाव घेतली होती. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला होता. तिनं पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार, संशयित तरूण या महिलेचा पाठलाग करत होता. ती ज्या ठिकाणी नोकरी करत होती, त्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत तो पाठलाग करत होता. तसेच त्याने अनेकदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यात अडवून गैरवर्तन केले. त्यानंतर मोबाइल हिसकावून पळाला होता.
धक्कादायक! लष्करातील जवानावर गावगुंडांनी केला हल्ला
अल्पवयीन मुलीकडे सेक्सची मागणी; फोटो व्हायरल करण्याची धमकी
तेलंगणात प्रेयसीची हत्या करून पुण्यात आला, पण…
लिफ्टमध्ये विचित्र बिघाड, चौथ्या मजल्यावरून कोसळून वृद्धाचा मृत्यू
Source: https://maharashtratimes.com/crime-news/mumbai-crime-news-stalkers-arrested-for-sending-lewd-texts/articleshow/77590377.cms