मुंबई बातम्या

टॅबचं वाटप करणाऱ्या मुंबई पालिकेच्या शाळेचेच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित – Sakal

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबई शहराला या व्हायरसचा फटका बसला आहे. त्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जाताहेत. त्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यात लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता ऑनलाईन शिकवणी सुरु आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं जातं. मात्र मुंबई महापालिकेचेचं विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असल्याचं समोर आलं आहे. 

मुंबई महापालिका ही विद्यार्थ्यांना टॅबवर शिक्षण देणारी पहिली महापालिका आहे. मात्र पालिकेतील शाळांमधील तब्बल ६० हजार विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून बाहेर आहेत. दरम्यान पालिकेनं कोट्यवधी रुपये खर्चून घेतलेले टॅब नादुरुस्त अवस्थेत असल्याचं समोर आलेत. हे टॅब सध्या धूळ खात पडलेत. 

अधिक वाचाः ‘या’ पुलावरून प्रवास करत असाल तर सावधान, पालिकेनं केलं आवाहन

लॉकडाऊन असल्यामुळे खासगी शाळांप्रमाणेच पालिकेच्या शाळांनीही मोबाईलवरुन इंटरनेट आधारे ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र पालिकेच्या शाळेतले तब्बल ५० ते ६० हजार विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचाः काय सांगता! गणेशोत्सवाच्या स्पेशल ट्रेनमध्ये केवळ ‘इतके’च प्रवासी

लॉकडाऊनच्या काळात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांसह वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झालेत. तर काही विद्यार्थी मुंबईत असूनही त्यापैकी अनेक मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत. स्मार्टफोन उपलब्ध नसल्यानं जवळपास ६० हजार विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दुरावल्याचं चित्र आहेत.

२०१५ मध्ये शिवसेनेनं आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब आणले.  शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं कमी करण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतला होता. २०१६ ला पुढील वर्षी ९ वीच्या आणि १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅबचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी पालिकेकडून सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना या टॅबचं वाटप करण्यात आलं होतं. मात्र यातले काही टॅब बंद पडलेत. सध्या या टॅबची अशी अवस्था झाली आहे की, हे टॅब दुरुस्त करावे लागतील किंवा काढून टाकावे लागतील. तसंच हे टॅब दुरुस्त करण्यासाठी कंत्राट देण्याचं देखील शिक्षण विभागानं ठरवलं होतं. पण शिक्षण समितीनं याला विरोध केला आणि त्यानंतर टॅब दुरुस्ती आणि टॅब खरेदीही रखडून गेली. दरम्यान आता हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले.

mumbai municipal corporations school students left from online teaching

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-municipal-corporations-school-students-left-online-teaching-334218