नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या १९,४४० झाली आहे. शहरात आज ४०७ नवे करोनाबधित रुग्ण आढळले असून करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. शहरात मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत.
वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या २० हजाराकडे जात आहे. शहरात आज ८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ४८६ झाली आहे. शहरात आतापर्यत एकूण तब्बल १५,४८५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ३,४६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ४०,८४२ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहे. करोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत.
नवी मुंबईतील करोनामुक्तीचा दर ८० टक्के झाला आहे. तर एकूण ७८,५४६ नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 12, 2020 9:50 pm
Source: https://www.loksatta.com/navimumbai-news/today-407-new-corona-patients-found-in-navi-mumbai-city-aau-85-2244326/