मुंबई बातम्या

mumbai university: मुंबई विद्यापीठाकडून दुसरी मेरिट लिस्ट जाहीर – Times Now Marathi

मुंबई विद्यापीठाकडून दुसरी मेरिट लिस्ट जाहीर& 

थोडं पण कामाचं

  • मुंबई विद्यापीठाकडून दुसरी मेरिट लिस्ट जाहीर
  • १२ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याचा कालावधी
  • विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट mu.ac.in या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता

मुंबई: मुंबई विद्यापीठमान्यताप्राप्त(mumbai university) कॉलेजेसने पहिल्या टप्प्यातील कागदपत्र पडताळणी(document verification) प्रक्रियेच्या नंतर ऑनलाईन पद्धतीने आता मुंबई विद्यापीठाकडून २०२०ची दुसरी मेरिट लिस्ट(second merit list) ११ ऑगस्टपासून जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. विद्यार्थी ही मेरिट लिस्ट विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट mu.ac.in या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात. मुंबई विद्यापीठ अंडर ग्रॅज्युएट प्रवेश २०२० सध्या विविध अभ्यासक्रमांसाठी सुरू आहे. आतापर्यंत एचआर कॉलेज, केसी कॉलेज, रुईया कॉलेज आणि एसआयएस कॉलेज ऑफ कॉमर्सने विविध कार्यक्रमांसाठी आपली २री मेरिट लिस्ट जाहीर केली आहे. 

कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याचा कालावधी १२ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२० इतका आहे. ज्यांना मुंबई विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे त्यांना मुंबई विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट mumoa.digitaluniversity.ac वर जावे लागेल. या ठिकाणी संबंधित कॉलेजेसच्या मेरिट लिस्टसह कट ऑफही जाहीर केले जातील. 

Mumbai university second merit list 2020 – कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. एचएससी मार्कशीट(HSC Marksheet)
  2. लिव्हिंग सर्टिफिकेट(Leaving certificate)
  3. एसएससी मार्कशीट(SSC Marksheet)
  4. आधार कार्ड(Aadhar Card)
  5. डिजीटल युनिर्व्हसिटी फॉर्म(DIgital university form)
  6. विद्यापीठ घोषणापत्र(कॉलेजच्या वेबसाईटवर उपलब्ध)

६ लाखाहून अधिक अॅप्लिकेशन

या वर्षी तब्बल ३.३ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आणि ६.२ अॅप्लिकेशन भरण्यात आले. 

बातमीची भावकी

पहिली लिस्ट ६ ऑगस्टला

मुंबई विद्यापीठाकडून प्रवेश प्रक्रियेसाठी पहिली लिस्ट ६ ऑगस्टला जाहीर करण्यात आली होती. त्यानंंतर दुसऱ्या दिवसापासून कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्यास अवधी देण्यात आला होता. 

कधी आहे तिसरी मेरिट लिस्ट?

  1. तिसरी मेरीट लिस्ट – १७ ऑगस्ट २०२० 
  2. तिसऱ्या यादीतील कागदपत्रे पडताळणी आणि फी भरण्यासाठी (अंडरटेकिंग फॉर्मसह) कालावधी १८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२० 

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-university-released-second-merit-list-for-admission/307368