नवी मुंबई : ‘कोव्हिड-19‘ विरोधातील लढाईत विविध सामाजिक संस्था (Navi Mumbai Corona), उद्योगसमूह यांच्या स्वयंस्फूर्तीने नवी मुबंई महानगरपालिकेला टाटा इंटरनॅशनल या कंपनीच्या सी. आर. निधीतून 1 कोटी 77 लाख रुपयांची वैद्यकीय सुरक्षा साधने देण्यात आली आहेत (Navi Mumbai Corona).
यामध्ये 10 हजार 500 नग एन-95 मास्क, 10 हजार सर्जिकल मास्क, 10 हजार 80 पीपीई किट्स, 2 हजार मेडिकल गॉगल्स, 2 हजार हॅन्डग्लोव्हज, 7 हजार शू-कव्हर अशी विविध सुरक्षा साधने देण्यात आली आहेत.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
या सुरक्षा साधनांचा उपयोग कोव्हिड योद्ध्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. टाटा उद्योगसमूहाने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्धेशाने केलेल्या या मदतीबद्दल महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आभार व्यक्त केले आहेत (Navi Mumbai Corona).
नवी मुंबईत 18 हजार 500 कोरोना रुग्ण
नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असताना, मृतांची संख्याही वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या 18 हजार 500 झाली आहे. शहरात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 465 झाली आहे.
शहरात आतापर्यत एकूण तब्बल 14 हजार 75 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर 3 हजार 615 रुग्णांवर सध्या शहरात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 32 हजार 300 प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत.करोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. करोनामुक्तीचा दर 77 टक्केपर्यंत पोहोचला असून, आतापर्यंत 14 हजार 80 जन करोनामुक्त झाले आहेत ही शहरासाठी समाधानकारक व दिलासादायक गोष्ट आहे. नवी मुंबईत एकूण 68 हजार 751 नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.
नवी मुंबईत जैविक कचऱ्याकडे दुर्लक्ष, डॉक्टरांच्या चेंजिंग रुमशेजारीच 5 दिवस कचरा पडूनhttps://t.co/G4vm14LatJ#NaviMumbai #BioWaste
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 8, 2020
Navi Mumbai Corona
संबंधित बातम्या :
कोबी तीन रुपये किलो, टोमॅटो दहा रुपयांखाली, नवी मुंबई APMC मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती गडगडल्या
नवी मुंबईत चार महिन्यांनी मॉल खुलले, पण एका दिवसात पुन्हा बंद, ग्राहकांच्या आनंदावर विरजण
कमेंट करा
Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/navi-mumbai-corona-tata-international-company-gave-1-crore-77-lack-medical-equipment-to-municipal-corporation-254068.html