नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली आहे. शहरात आज करोना काळातील एका दिवसातील सर्वाधिक ४५५ नवे करोनाबधित रुग्ण आढळले आहे.
नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असताना, मृतांची संख्याही वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १८ हजार १४९ झाली आहे. शहरात आज सात जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४६१ झाली आहे.
शहरात आतापर्यत एकूण तब्बल १४ हजार ७३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ३ हजार ६१५ रुग्णांवर सध्या शहरात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३२ हजार २२८ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत.करोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. करोनामुक्तीचा दर ७७ टक्केपर्यंत पोहोचला असून, आतापर्यंत १४ हजार ७३ जन करोनामुक्त झाले आहेत ही शहरासाठी समाधानकारक व दिलासादायक गोष्ट आहे. नवी मुंबईत एकूण ६८ हजार ६७१ नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 8, 2020 9:37 pm
Source: https://www.loksatta.com/navimumbai-news/455-new-corona-positive-seven-killed-in-navi-mumbai-today-msr-87-2240729/