मुंबई बातम्या

येत्या 24 तासात मुंबईत कसा असेल पाऊस, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स – Sakal

मुंबईः येत्या 24 तासात मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  भारतीय हवामान शास्त्र विभागाने मुंबईत ऑरेंज तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात पुढच्या दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 

येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 3, 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  हवामानातल्या या बदलांमुळे मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्र त्याच बरोबर घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.  राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे.

मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात बहुतांश ठिकाणी येत्या दोन दिवसांमध्ये मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा पुणे वेधशाळेनं देखील दिला आहे. तर हवामानाच्या या बदलांमुळे समुद्र किनारा असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेगही मोठा प्रमाणात असू शकतो. यादरम्यान, समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात उतरू नका असं आवाहन करण्यात आलंय.

हेही वाचाः दुःखाचा डोंगर, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन

हवामान खात्याने (IMD), ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचे संकेत देली असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. 

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही प्रामुख्याने घाटमाथ्याच्या क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान विदर्भासह राज्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी असणार आहे.

अधिक वाचाः धनंजय मुंडेना कोणी पाठवली नशाबंदीची राखी? नक्की काय केलीये मागणी वाचा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 3 ऑगस्टला पावसाचा जोर वाढणार आहे. या दिवशी कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील घाटक्षेत्रात मुसळधार पाऊस होईल. 4 ऑगस्टला कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 5 ऑगस्टलाही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भातही कमी-अधिक पावसाचा अंदाज आहे.

IMD predicts heavy rain mumbai orange alert august 5 thane navi mumbai

Source: https://www.esakal.com/mumbai/imd-predicts-heavy-rain-mumbai-orange-alert-august-5-thane-navi-mumbai-329250