मुंबई : मुंबईतील फोर्ट परिसरात भानुशाली या रहिवाशी (Mumbai Building Collapsed Accidents) इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली. भानुशाली इमारतीचा 40 टक्के भाग कोसळला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 20 जण अडकल्याची भीती आहे. तर आतापर्यंत चौघांना ढिगाऱ्याखालून सुखरुप काढण्यात यश आलं आहे. मात्र, धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना झाल्याची ही काही पहिली वेळ नाही (Mumbai Building Collapsed Accidents).
मुंबईत गेल्या तीन दिवसापासून तुफान पाऊस आहे. त्यामुळे धोकादायक इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या दोन दिवसात मुंबईत चार इमारती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मुंबई हादरुन गेली आहे. फोर्ट प्रमाणेच गेल्या दोन दिवसात मरिन लाईन्स, ग्रँट रोड आणि मालवणीत इमारत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. मालवणीच्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
मुंबईत गेल्या सात वर्षांत 3945 इमारत दुर्घटना
मुंबईत गेल्या सात वर्षांत (2013-2019) मुंबईत तब्बल 3945 इमारतींचे भाग कोसळून 300 जणांचा बळी तर 1146 जण जखमी झाले आहेत.
गेल्यावर्षी म्हणजे 2019 मध्ये घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळण्याच्या 622 घटना घडून 51 लोकांचा मृत्यू झाला तर 227 लोक जखमी झाले होते.
वर्षाप्रमाणे आकडेवारी!
– 2013 मध्ये 531 घर / घरांचे भाग / भिंती / इमारती / इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये 101 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 58 पुरुष आणि 43 स्त्रियांचा समावेश आहे. तर 183 जण जखमी झाले आहेत. त्यात 110 पुरुष आणि 73 स्त्रियांचा समावेश आहे.
– 2014 मध्ये 343 घर / घरांचे भाग / भिंती / इमारती / इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 17 पुरुष आणि 4 स्त्रियांचा समावेश आहे. तर 100 लोक जखमी झाले असून त्यात 62 पुरुष आणि 38 स्त्रियांचा समावेश आहे.
– 2015 मध्ये 417 घर / घरांचे भाग / भिंती / इमारती / इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना आहेत. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 11 पुरुष आणि 4 स्त्रियांचा समावेश आहे. 120 जण जखमी झाले असून त्यात 79 पुरुष आणि 41 स्त्रियांचा समावेश आहे (Mumbai Building Collapsed Accidents).
– 2016 मध्ये 486 घर / घरांचे भाग / भिंती / इमारती / इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तर 24 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 17 पुरुष आणि 7 स्त्रियांचा समावेश आहे. तर 172 लोक जखमी झाले असून त्यात 113 पुरुष आणि 59 स्त्रियांचा समावेश आहे.
– 2017 मध्ये 568 घर / घरांचे भाग / भिंती / इमारती / इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तर 66 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 44 पुरुष आणि 22 स्त्रियांचा समावेश आहे. तर 165 जण जखमी झाले असून त्यात 101 पुरुष आणि 64 स्त्रियांचा समावेश आहे.
– 2018 मध्ये 619 घर / घरांचे भाग / भिंती / इमारती / इमारतींचे भाग कोसळण्यच्या घटना आहेत. तर 15 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 12 पुरुष आणि 3 स्त्रियांचा समावेश आहे. तर 79 जण जखमी झाले असून त्यात 60 पुरुष आणि 19 स्त्रियांचा समावेश आहे.
गेल्या सहा वर्षात 49 हजार 179 दुर्घटना
2013 ते 2018 या सहा वर्षात 49 हजार 179 दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये 987 लोकांचा मृत्यू गेला आहे. तर, 3066 जण जखमी झाले आहेत.
2019 मध्ये घर पडणे, इमारत किंवा इमारतीचा भाग कोसळणे, शॉक लागणे, नाल्यात समुद्रात वाहून जाणे, बुडणे अशा प्रकारच्या 9 हजार 943 आपत्कालीन दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये 137 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 579 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये 372 पुरुष तर 207 महिलांचा समावेश आहे.
Mumbai Building Collapse | मुंबईत रहिवाशी इमारतीचा भाग कोसळलाhttps://t.co/06o8oJKywU#MumbaiBuildingCollapse
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 16, 2020
Mumbai Building Collapsed Accidents
संबंधित बातम्या :
Bhanushali Building collapse | दुर्लक्ष नाही, पण आम्ही लोकांना घरातून खेचून बाहेर काढू शकत नाही : महापौर
कमेंट करा
Source: https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-total-building-collapsed-accidents-in-past-7-years-244282.html