मुंबई बातम्या

सलग तिसऱ्या दिवशी तुंबली मुंबई; अत्यावश्यक सेवांची रखडपट्टी.. – Sakal

मुंबई: सलग तिसऱ्या दिवशी आज मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. विशेषता पश्चिम उपनगरांना पावसाचा चांगला फटका आहे.  लॉकडाऊन मुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रामुख्याने बाहेर पडत असल्याने त्यांना या तुंबलेल्या पाण्यातून वाट काढण्याची कसरत करावी लागली. तर अनेक भागात वाहतूक वळवण्यात आल्याने त्यांच्या मनस्तापात अधितच भर पडली. शुक्रवार पासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

कुलाबा  येथे सकाळी 8 वाजल्या पासून संध्याकाळी 5.30 वाजे पर्यंत 18.8 मिमी आणि सांताक्रुझ येथे 129.4 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. अॅन्टॉपहिल, गांधी मार्केट, शिव रोड नंबर 24, प्रतिक्षा नगर , कुर्ला बैैैल बाजार शितल सिनेमा, नॅशनल कॉलेज वांद्रेे, विरा देसाई रोड अंधेरी या मुख्य रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे वाहतूक वळविण्यात आली होती. तर, हिंदमाता परीसरात पाणी तुंबले होते मात्र वाहतूक वळवण्यात आली नव्हती असा दावा पालिकेने केला.

हेही वाचा: निकाल तर लागला मात्र आता प्रवेशाचे टेन्शन; सीईटीच्या परीक्षेसाठी उजाडणार सप्टेंबर..

मागील तीन दिवसांपासून मुंबई परीसरात जोरदाार पाऊस सुरु आहेत. त्यामुळे अनेक भागात पाणी साचून वाहतूकीचा खोळंबा उडाला होता.  शुक्रवार पासून मुंबईसह रायगड,ठाणे पालघर जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरणार असून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

इथे तुंबली मुंबई: 

हिंदमाता,  सक्कर पंचायत चौक वडाळा, दादर टि.टी, गांधी मार्केट, वडाळा फायर स्टेशन, शिव रोड नंबर 24, एसआयईएस महाविद्य्लय, प्रतिक्षा नगर, बैल बाजार, शेल कॉलनी , टेंबी ब्रीज ,पोस्टल कॉलनी चेंबूर, अंधेरी सबवे,नॅशनल कॉलेज वांद्रे, वीरा देसाई रोड अंधेरी.

100 मिमी पेक्षा जास्त पाऊस:

वांद्रे पुर्व — 135.86

अंधेरी पुर्व — 143.5

मरोळ फायर स्टेशन — 123.65

विलेपार्ले — 133.62

सांताक्रुझ –103.89

हेही वाचा: मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच; आज तब्बल ‘इतके’ नवे रुग्ण..जाणून घ्या आजची आकडेवारी 

अंधेरी पश्चिम — 146.56

वर्सेावा — 150.36

मालवणी — 144

गोरेगाव — 144.25 

कांदिवली — 123.2 

 

संपादन : अथर्व महांकाळ 

heavy rain in mumbai from last 3 days 

Source: https://www.esakal.com/mumbai/heavy-rain-mumbai-last-3-days-322229