मुंबई बातम्या

मुंबईसह पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता | mumbai weather may heavy rainfall in mumbai, thane raigad today – Zee २४ तास

मुंबई : हवामान विभागाकडून मुंबईत गुरूवारी अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारपासून राज्यभरात पावसाने हजेरी लावली. बुधवारी ठाणे जिल्ह्यात पावसाची रिमझीम सुरूच होती. पहाटेपासून जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावस बरसत आहे. त्यामुळे आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आणि योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात येत आहे. 

शिवाय, मुंबईच्या अनेक सखोल भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विटकरत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर शुक्रवारपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

सांताक्रूझ येथे मंगळवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत ८०.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कुलाबा येथे ३९.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर दादर, वांद्रे, वर्सोवा, विलेपार्ले आणि सांताक्रूझ या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस झाला. तर दक्षिण मुंबई, ग्रॅट रोड, गोरेगाव, बोरिवली या इतर भागात साधारण १५ ते ६५ मिमी पाऊस नोंदविण्यात आला.

गुरूवारी मुंबईसह पालघर, रायगडमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाती पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नगरिकांनी गरज नसल्यास घरा बाहेर पडू नये. 

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/mumbai-weather-may-heavy-rainfall-in-mumbai-thane-raigad-today/527443