Mumbai Rains Live Update मुंबई : मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस कोसळत आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरात नेहमीप्रमाणे गुडघाभर पाणी तुंबलं आहे. पुढील दोन दिवस मुंबई, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या 24 तासात पालघरमधील डहाणू 128 mm,कुलाबा 121.6 mm, सांताक्रुज 96.6 mm, रत्नागिरी 101.3 mi अलिबाग 122.6 mi इतक्या पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिली. (Mumbai Rains Live Update)
पुढचे 2 दिवस मुंबई, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.
गेल्या 24 तासात,
डहाणू 128 mm, कुलाबा 121.6 mm
सांताक्रुज 96.6 mm, रत्नागिरी 101.3 mi
अलिबाग 122.6 mi
काळजी घ्या pic.twitter.com/n2fNOaJ3lR— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 15, 2020
हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यासारख्या कोकण किनारपट्टी भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहेत. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
#WATCH Maharashtra: Waterlogging in parts of Mumbai due to incessant rainfall; visuals from King’s Circle area. pic.twitter.com/JJS5ytebob
— ANI (@ANI) July 15, 2020
अंधेरी सब वेत पाणी भरलं
अंधेरी सब वे या भागात तुफान पाऊस बरसत आहे. त्यामुळे अंधेरी सब वे भागात पाणी तुंबण्यास सुरु झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी ट्रॅफिक जॅम होत आहे.
तीन दिवस हवामान विभागाचा अंदाज
- 14 जुलै 2020 – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
- 15 जुलै 2020 – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
- 16 जुलै 2020 -मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज
[embedded content]
संबंधित बातम्या
Rain Update | मुंबईसह कोकणात धो-धो, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
कमेंट करा
Source: https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-rain-live-update-mumbai-rains-hindmata-kings-circle-waterlogging-243461.html