मुंबई : मुंबईत शुक्रवारपासून पाऊस सुरु आहे. सोमवारपर्यंत सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरु होता. सोमवारी काही तासांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मुंबईसह काही उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
मुंबई, नवी मुंबई, कोकण किनारपट्टी, महाराष्ट्रातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस Mumbai rain सुरु आहे. देशातील बहुतांश भागातही पावसाला सुरुवात झाली आहे. एकीकडे मान्सून शहरात आणि राज्यात स्थिरावत असतानात दुसरीकडे मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील सखल भागांत पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला होता. शनिवारी रात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सायन, हिंदमाता आणि इतर अनेक सखल भागात पाणी साचलं होतं.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन लाखांचा आकडा पार केला असून त्यापैकी एकट्या मुंबईत कोरोना रुग्ण संख्या 80 हजारांवर गेली आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करताना आता नागरिकांना पावसाच्या दिवसांतही सतर्क राहावे लागणार आहे.
Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/heavy-rainfall-in-mumbai/526392