मुंबई: मुंबई विभागातील कोरोना बाधीत एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. एकट्या मुंबई विभागातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 49 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, कुर्ला नेहरूनगर आगारातील 23 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: मुंबईकरांनो आता ‘इथेही’ मास्क वापरणं बंधनकारक; नाहीतर १ हजाराचा दंड..
मुंबई, ठाणे, पालघर या आगारातील एसटी कर्मचाऱ्यांकडून मुंबई उपनगरात दैनंदिन अत्यावश्यक सेवा देण्यासाठी एसटी कर्मचारी काम करत होते. दरम्यान या कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक आगाराच्या विश्राम गृहात राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
मात्र, या कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर, सर्वाधिक मुंबई विभागातील 49 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती मुंबई विभाग नियंत्रकांनी एसटी महामंडळाच्या मुख्य कामगार अधिकाऱ्यांना दिली आहे.
आधीच एसटीची नियमीत प्रवासी सेवा बंद असल्याने एसटीच्या उत्पन्न बुडाले आहे. त्यामध्ये मुंबई उपनगरामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचाच जिव धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाने मे महिन्याचे वेतन सुद्धा 50 टक्केच दिला आहे.
हेही वाचा: बेस्ट कामगारांवर बडतर्फीची टांगती तलवार; ‘इतक्या’ कामगारांना बेस्ट प्रशासनाने बजावल्या नोटिसा..
त्यामूळे एकीकडे कोरोनाचे संकट, दुसरीकडे आर्थीक संकट अशा दुहेरी संकटात एसटी महामंडळाचे कामगार सापल्याने, कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ST employees in mumbai are corona positive
Source: https://www.esakal.com/mumbai/st-employees-mumbai-are-corona-positive-314413