मुंबईच्या दादरमध्ये शिंदेवाडी भागात एका पोलिसाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची थरारक घटना समोर आली आहे. तब्बल चार तास हे थरारनाट्य सुरू होतं, अखेर वरिष्ठ पोलिसांनी विनवणी केल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचारी आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाला.
शनिवारी सकाळी १० ते ११ च्या सुमारास एक व्यक्ती चार मजली इमारतीच्या कठड्यावर उभी असल्याचं काही रहिवाशांच्या निदर्शनास आलं. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न पोलीस अधिकारी, इमारतीतील रहिवासी करत होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अखेर चार तासांनंतर वरिष्ठ पोलिसांनी विनवणी केल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचारी आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाला. सुशांत पवार असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या २९ वर्षीय पोलिसाचे नाव असून त्यांनी मानसिक तणावातून हे पाऊल उचचलं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 14, 2020 10:14 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-cop-threatens-to-jump-off-building-gets-rescued-sas-89-2186971/