मुंबई ः महाराष्ट्र सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे आणि अटींचे पालन करून आज ‘बॉम्बे डे’ या वेबसीरीजचा मुहूर्त आज एन. डी. स्टुडिओत झाला. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरकारची परवानगी मिळाल्यानंतर पुढील आठवड्यात चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
वाचा ः रसिक प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येत आहे ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’; वाचा कधी येणार तर…
भरत सुनंदा लिखित आणि दिग्दर्शित ही वेबसीरीज आहे. ती मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये येणार आहे. एकूण चौदा भाग असलेल्या या वेबसीरीजमध्ये अनेक नामवंत कलाकार काम करणार आहेत. ही वेबसीरीज गुन्हेगारी विश्वावर बेतलेली आहे. मुंबईतील एका अंडरवर्ल्ड डॉनची कहाणी यामध्ये मांडण्यात आली आहे. या अंडरवर्ल्ड डॉनचा एन्काऊंटर एका बड्या पोलिस अधिकाऱ्याने केला होता. हा एन्काउंटर मुंबईतील सर्वात मोठा एन्काउंटर मानला जातो. त्याबद्दलची ही थ्रिलिंग कथा आहे.
वाचा ः अभिनेता कमाल खान पुन्हा झाला ट्रोल; वाचा नेमकं काय केलंय त्याने….
याबाबत दिग्दर्शक भरत सुनंदा म्हणाले, की आम्ही काही मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत या वेबसीरीजचा मुहूर्त आज केला. सरकारचे सगळे नियम पाळून तो करण्यात आला. मात्र चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आलेली नाही. सरकारकडे आम्ही परवानगी मागितली आहे. सरकारचे जे नियम असतील ते पाळून चित्रीकरण करण्यात येईल. सेटवरील सगळ्यांनी मास्क घालणे, हात वारंवार सॅनिटायरने धुणे, सेटवर डॉक्टर्स ठेवणे, तसेच तापमान तपासणे वगैरे गोष्टींचे पालन करून चित्रीकरण करणार आहोत. पुढील आठवड्यात ते सुरू होईल असे वाटते.
वाचा ः ‘ला लीगा’मध्ये अनुभवता येणार प्रेक्षकांचा जल्लोष; मात्र कसा घ्या जाणून…
या वेबसीरीजमध्ये किशोरी शहाणे आणि त्यांचे पती दीपक बलराज वीज हे काम करणार असल्याचे निश्चित झाले आहे. अनुपम खेर, जॅकी भगननी, अनिकेत विश्वासराव या कलाकारांशी बोलणी सुरू आहेत. ही वेबसीरीज पोलिस अधिकारी विजय साळसकर यांच्या कारकिर्दीवर प्रेरित आहे.
Source: https://www.esakal.com/manoranjan/muhurta-web-series-based-mumbai-crime-world-named-bombay-day-done-n-d-studio-304549