मुंबई : शहर आणि मुंबई उपनगरात सकाळी जोरदार पाऊस कोसळत आहे. यापावसाने मुंबईत सकल भागात पाणी साचले होते. नवी मुंबईत पहाटे पाऊस कोसळत होता. तर अंबरनाथ ग्रामीण आणि कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटे पासून पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
BreakingNews । मुंबई शहरात चांगला पाऊस पडत आहे । घाटकोपर येथे सकाळपासून पावसाचा जोर दिसून येत आहे. #Rain #Mumbai https://t.co/kpo9phlA1j pic.twitter.com/PLJSvFc6sd
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 6, 2020
चक्रीवादळाच्या विश्रांतीनंतर एक दिवस पाऊस झाला. त्यानंतर पहाटेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. मुंबईकरांना मुसळधार पावसाच्या सरी अनुभवयाला मिळत आहेत. आज सकाळपासूनच मुंबईवर ढगांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. पवई, घाटकोपर, वांद्रे, चेंबूर, लालबाग, सायन, दादर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी येथेही चांगला पाऊस झाला.
BreakingNews । मुंबई उपनगरात सकाळपासून पाऊस कोसळत आहे । कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासून ढगांचा गडगडाटसह जोरदार पाऊस #Rain #Mumbai https://t.co/kpo9phlA1j pic.twitter.com/TFRAEOz36Y
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 6, 2020
दक्षिण मुंबई
BreakingNews । मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी। दक्षिण मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस #Rain #Mumbai https://t.co/kpo9phlA1j pic.twitter.com/9RDHeIpyJI
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 6, 2020
जोरदार पाऊस
BreakingNews । कल्याण -डोंबिवली परिसरात सकाळपासून ढगांचा गडगडाटसह जोरदार पाऊस #Rain #Mumbai https://t.co/kpo9phlA1j pic.twitter.com/1mOlE9IN4Q
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 6, 2020
Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/morning-rain-in-mumbai/522899