मुंबई पोर्ट ट्रस्ट ने करोना रूग्णांवर उपचारांसाठी १२० खाटांचे रूग्णालय सुरू केले आहे. व्हेंटिलेटर्स,आयसीयू, ऑक्सिजन, पीपीई किट्स आणि सर्व वैद्यकीय सामग्री सुसज्ज ठेवण्यात आली आहे, असे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले.
पोर्ट ट्रस्टच्या रूग्णालयात १०० खाटांची व्यवस्था होती. पण करोना संकटामुळे हे रूग्णालय अद्ययावत करून त्याची क्षमता वाढविण्यात आली आहे. आता करोना रूग्णांसाठी १२० आणि अन्य आजारांसाठी २५ खाटांची व्यवस्था आहे. आतापर्यंत ३३३ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती भाटिया यांनी दिली.
पोर्ट ट्रस्टचे सुमारे एक लाख कर्मचारी,निवृत्त कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आदींना रूग्णालयाची सुविधा उपलब्ध आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 26, 2020 12:27 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/120-bed-hospital-of-mumbai-port-trust-abn-97-2170927/