मुंबई बातम्या

महत्त्वाची बातमी : मुंबई-पुण्याबाबतचा “तो” व्हायरल मेसेज खोटा! – Sakal

पुणे : शनिवारपासून 10 दिवस मुंबई, पुण्यात सैनिकी लॉकडाऊन असेल, सर्वकाही साठवा. उद्धव ठाकरे नियंत्रण सोडत आहेत, असा थेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलेला एक मेसेज मंगळवारी दिवसभर व्हॉट्सअपवर व्हायरल होत होता, मात्र हा मेसेज खोटा असून, नागरीकांनी त्यावर विश्वास ठेवु नये, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले. तसेच हा प्रकार करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

आणखी वाचा – विद्यापीठ चौकातील दोन पुलांचा निर्णय झाला! 

कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर सोशल मीडियावर खोटे व चुकीचे मेसेज, व्हिडिओ व मजकूर प्रसारित करणे सायबर कायद्यानुसार गुन्हा असून त्यासाठी कारावासाची शिक्षा आहे. त्यानुसार राज्यात खोटी माहिती पसरविणाऱ्या सव्वा दोनशे जणाना अटक करुन 400 जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे, असे असतानाही मंगळवारी दिवसभर एक मेसेज व्हाट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियावर व्हायरल होत होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

“शनिवारपासून 10 दिवस मुंबई, पुण्यात सैनिकी लॉकडाऊन असेल, सर्वकाही साठवा. उद्धव ठाकरे नियंत्रण सोडत आहेत. शहर सैन्याच्या स्वाधीन करणार आहे. तरी कृपया सर्वकाही साठवा. फक्त दूध आणि औषध उपलब्ध असेल.महाराष्ट्र सरकारची बैठक चालू असून मुंबईत संपूर्ण बंद पडण्याची घोषणा केव्हाही होईल” असा मजकूर असलेला हा मेसेज फिरत होता.

आणखी वाचा – मुंबईकरांमुळं पुणेकर धोक्यात; कोरोनाचा मुंबई-पुणे-मुंबई प्रवास

दरम्यान, याविषयी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी हा मेसेज खोटा आहे. नागरीकांनी त्यावर विश्वास ठेवु नये आणि घाबरुन जाऊ नये, असे स्पष्ट केले. तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करुन हा मेसेज पाठविणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी इशारा दिला आहे.

Source: https://www.esakal.com/pune/coronavirus-mumbai-pune-lock-down-rumors-police-clarifies-298202