मुंबई बातम्या

अख्खी मुंबई कोरोनाच्या ‘कैदेत’, संशयित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ – Sakal

मुंबई :  मुंबईकरांची कोरोनाकैदेतून लवकर सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिवसाला दीड हजार नवे रुग्ण सापडण्याच्या शिरस्त्यानुसार सोमवारी 1430 बाधितांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांची संख्या 31,789 वर पोहोचली आहे.  कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. सोमवारी 330 जणांना घरी पाठवण्यात आले असून, आतापर्यंत 8404 रुग्ण बरे झाले आहेत. परंतु, 38 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी सांगण्यात आल्याने कोव्हिड-19 विषाणूबळींची संख्या 1026 झाली  आहे. 

महत्वाची बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, आठवड्याभरात मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर ‘इतका’ वाढला

मुंबईत सोमवारी कोरोनाच्या 38 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 27 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 26 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. दगावलेल्या रुग्णांपैकी तिघे 40 वर्षांखालील, 15 जण 60 वर्षांवरील आणि 20 जण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. त्यामुळे मुंबईतील कोव्हिड-19 विषाणूच्या बळींची संख्या 1026 वर पोहोचली  आहे.

नक्की वाचा : उत्तर प्रदेश सोशल मीडिया डेस्कला धमकी देणारा आला गोत्यात, महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यातून अटक

संशयित रुग्णांमध्येही वाढ झाली असून, सोमवारी 825 नवे संशयित रुग्ण सापडले. आतापर्यंत 25,956 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. सोमवारी 330 रुग्णांना रुग्णालयांतून सोडण्यात आले; आतापर्यंत 8404 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Mumbaikars’ corona positive patient continues to grow, Record of 1430 new patients

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbaikars-corona-positive-patient-continues-grow-record-1430-new-patients-297894