देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये दिवसागणिक करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. शनिवारी दिवसभरात मुंबईमध्ये एक हजार ५६६ नव्या रूग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या २८ हजार ६३४ झाली आहे. देशात सर्वाधिक करोनाग्रस्त मुंबई शहरात आहे. मुंबईमध्ये करोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या हजरांकडे गेली आहे.
मागील २४ तासांत मुंबईमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाग्रस्तांच्या बळींची संख्या ९४९ वर गेली आहे. मागील २४ तासांत राज्यात ६० जणांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी एकट्या मुंबईत ४० जण आहेत. मृतांमध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत, तर २४ रुग्ण वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. मृतांपैकी ७ जण ४० वर्षांच्या आतील आहेत.
मुंबईत मागील २४ तासांत आणखी किमान एक हजार संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. चोवीस तासांत अतिजोखमीचे ७३९५ संपर्क शोधण्यात आले, तर ५४५२ लोकांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या वाढलेलीच दिसणार आहे.
मुंबईसह उपनगरातही करोनाता विळखा वाढतच चालला आहे. ठाणेस वसई आणि नवी मुंबईमध्येही करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी ३१८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. ठाणे जिल्ह्य़ातील रुग्णांची संख्या आता ५ हजार ३८८ इतकी झाली आहे. नवी मुंबईत ७४, कल्याण-डोंबिवली शहरातील ३०, उल्हासनगर शहरातील १०, बदलापूर शहरातील ६, मीरा-भाईंदरमध्ये ३५ व ठाणे ग्रामीणमधील २४ रुग्णांचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 24, 2020 8:15 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/over-28000-covid-19-cases-in-mumbai-nck-90-2169729/