करोना विषाणूने राज्यातील पोलीस दलातील पाचवा बळी मंगळवारी रात्री घेतला. मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर शंकर वाघमारे यांचां करोना विषाणूमुळे रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८ पोलिस कर्मचाऱ्यांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
मुंबईतील शिवडी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर शंकर वाघमारे यांचं कोरोना विरुद्ध लढताना दुःखद निधन झालं.
पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत.
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) May 12, 2020
महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटरवरून याबाबत माहिती देण्यात आली. मुरलीधर वाघमारे यांना पोलिस महासंचालक तसेच विविध श्रेणींमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच वाघमारे कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 13, 2020 1:35 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/corona-fifth-victim-in-mumbai-police-force-abn-97-2160099/