मुंबई बातम्या

दिलासा : मुंबई विद्यापीठाची विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्पलाईन’, असा साधा संपर्क – Sakal

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी ) व राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशांनुसार मुंबई विद्यापीठाने हेल्पलाईन व ई-मेल सुविधा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना हेल्पलाईन क्रमांक व ई-मेलच्या माध्यमातून परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात माहिती मिळेल.

नक्की वाचा : मद्य खरेदीसाठी आता ‘इ-टोकन’; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे व महाविद्यालयांच्या परीक्षांबाबत राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती नेमली होती. या समितीच्या शिफारसीनुसार पदवी व पदव्युत्तर वर्गांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाने पदवी स्तरावरील द्वितीय व तृतीय वर्ष व पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या प्रवेशांबाबत निर्देश दिले होते; तसेच या संदर्भात अधिक तपशील प्रसिद्ध करू, असे जाहीर केले होते. त्यानुसार परीक्षा व प्रवेशाबाबत कृती योजना तयार केली जात आहे. विद्याशाखेनुसार तपशील लवकरच जाहीर केला जाईल, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले.

हे ही वाचा : गावी जायंचय मग, ‘ई-पास’ मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

येथे साधा संपर्क
विद्यार्थ्याना परीक्षा व प्रवेशाबाबत काही समस्या किंवा अधिक मार्गदर्शन हवे असल्यास 9619034634 व 9373700797 हे हेल्पलाईन क्रमांक व  [email protected] या ई-मेलवर संपर्क करता येईल. हेल्पलाईन सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असेल.

नक्की वाचा : मद्य खरेदीसाठी आता ‘इ-टोकन’; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

आयडॉलच्या विद्यार्थ्यांसाठी
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) विद्यार्थ्यांना [email protected] या ई-मेलवर संपर्क साधता येईल. या ई-मेल आयडीवरून परीक्षा व प्रवेशाबाबत माहिती मिळेल.

Mumbai University’s Helpline for students, do a simple contact

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-universitys-helpline-students-do-simple-contact-292165